तुम्ही लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात आपल्या कर्जाचे हफ्ते वेळेत भरले आहेत? - EMI - केंद्र सरकारकडून मिळणार कॅशबॅक

तुम्ही लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात आपल्या कर्जाचे हफ्ते वेळेत भरले आहेत?
- EMI - केंद्र सरकारकडून मिळणार कॅशबॅक

belgavkar.com | belgaum | belgavkar

लॉकडाऊनदरम्यान वेळेत भरले EMI?

तुम्ही लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात आपल्या कर्जाचे हफ्ते भरले आहेत? तर केंद्र सरकारकडून तुम्हाला कॅशबॅक मिळणार आहे. लॉकडाऊन काळात नियमित कर्जाचे हफ्ते (EMI or equated monthly installment) भरणार्‍या ग्राहकांसाठी केंद्र सरकारकडून एक योजना जाहीर केली आहे. ज्यांनी लोन मोराटोरियमचा (Loan Moratorium) फायदा घेतला होता त्यांचे व्याजावरील व्याज माफ होणार आहे. तसेच ज्यांनी या सुविधेचा फायदा न घेत वेळेत हफ्ते भरले होते त्यांच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होणार आहे.
कुणाला मिळणार कॅशबॅक?
केंद्र सकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या ग्राहकांनी मोराटोरियम सुविधेचा फायदा घेतला नाही, ज्यांनी लॉकडाऊन काळात नियमित कर्जाचे हफ्ते भरले. त्यांना कॅशबॅक मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना 6 महिन्यांमधील व्याजाची रक्कम त्यांच्या खात्यात मिळणार आहे.
जावडेकर यांनी केली घोषणा : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ज्यांनी वेळेत आपल्या कर्जाचे EMI भरले आहेत, त्यांना व्याजावरील व्याजाच्या हिशोबावरून कॅशबॅक मिळणार आहे. तसेच ज्यांनी वेळेवर हफ्ते भरले नाहीत त्यांच्या व्याजवरील ते व्याज केंद्र सरकार भरणार आहे.


मोदी सरकार का बड़ा फैसला – जिन्होंने समय पर EMI भरा है, उनको ब्याज पर ब्याज के हिसाब से कॅश बैक मिलेगा।
जो EMI समय पर नहीं दे सके, उनके ब्याज पर ब्याज सरकार भरेगी।
— Prakash Javadekar


सर्व कर्जदारांना होणार याचा फायदा : या योजनेच्या अंतर्गत गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, क्रेडिट कार्ड, वाहन कर्ज, लघू व मध्यम कर्जधारकांना या योजनेचा फायदा होणार आहे.
RBI ने दिली होती लोन मोरेटोरियमची सुविधा : लॉकडाऊन काळात 6 महिन्यांसाठी हफ्ते पुढे ढकलण्याची मुभा रिझर्व्ह बँकेने दिली होती. जे ग्राहक लॉकडाऊन काळात हफ्ते भरण्यास असमर्थ होते त्यांनी या योजनेचा फायदा घेतला.


31 ऑगस्ट पर्यंत होती सुविधा : 1 मार्च ते 31 ऑगस्ट पर्यंत लोन मोरेटिरयमची सुविधा देण्यात आली होती. ही सुविधा दिल्यानंतर मोरेटिरयम काळातील व्याजावरील व्याजाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. तेव्हा केंद्र सरकारने आश्वासन देत कर्जदारांना व्याजावर व्याज द्यावे लागणार नाही याची शाश्वती दिली होती. त्यामुळे सरकारी तिजोरीवर 7 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.


व्याजावर सूट : केंद्र सकारने 2 कोटी रुपये पर्यंत कर्जधारकांना नवीन योजनेचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीन्य्सार 6 महिन्यांपर्यंत 2 कोटी रुपये पर्यंत कर्ज घेतलेल्या ग्राहकांना कर्जाच्या व्याजावरील व्याजात सूट मिळणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

तुम्ही लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात आपल्या कर्जाचे हफ्ते वेळेत भरले आहेत? - EMI - केंद्र सरकारकडून मिळणार कॅशबॅक
लॉकडाऊनदरम्यान वेळेत भरले EMI?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm