बेळगाव : अतिवाड गावामध्ये सुरु झाली ओपन जिम; ओपन जिमची संकल्पना बेळगावात रूजत आहे

बेळगाव : अतिवाड गावामध्ये सुरु झाली ओपन जिम;
ओपन जिमची संकल्पना बेळगावात रूजत आहे

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अतिवाड विभाग मार्फत कु. सुशिलराव प्रकाशराव देसाई (उचगाव) यांच्यातर्फे गावासाठी ओपन जिम भेट देण्यात आली आहे. धकाधकीच्या जीवनात सर्वांनीच आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे; त्यासाठीच सहज साधने उपलब्ध व्हावीत, यासाठी ओपन जिमची संकल्पना सुरू झाली आणि ती बेळगावात रूजली. अतिवाडच्या गावाकर्यांसाठी उभारलेल्या या जीमचा फायदा नक्की होईल. या जिममध्ये 20 प्रकाराचे व्यायाम करता येतात. मुंबईत सुरु झालेल्या ओपन जिमच्या धर्तीवर गावात ही जिम सुरु करण्यात आली आहे. याचा फायदा सैन्यात भरती होणार्या युवकांसाठी तसेच गावातील नागरिकासाठी होणार आहे.
व्यायाम हा जीवनातील एक महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. युवकांमध्ये सातत्याने व्यायामाची आवड निर्माण होण्यासाठी खुल्या जीमची निर्मिती केली आहे. या जिमच्या उदघाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन भाजपाचे माजी आमदार संजय पाटील, भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, मिथील जाधव, गावडु पाटील, दत्तु पाटील, प्रवीण पाटील व गावातील नागरिक उपस्थित होते. प्रत्येक गावामध्ये अशा ओपन जिम सुरु करण्याचे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अतिवाड गावप्रमुख यतेश हेब्बाळकर यांनी केले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अतिवाड गावामध्ये सुरु झाली ओपन जिम; ओपन जिमची संकल्पना बेळगावात रूजत आहे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm