मुख्यमंत्री येडीयुरप्पा मुख्यमंत्रीपदावरुन पायऊतार होणार नाहीत...

मुख्यमंत्री येडीयुरप्पा मुख्यमंत्रीपदावरुन पायऊतार होणार नाहीत...

belgavkar.com | belgaum | belgavkar

शंकरगौडा पाटील यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण... बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक

आगामी 3 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा कालावधी येडियुरप्पा यशस्वीपणे पूर्ण करतील
आगामी 3 वर्ष मुख्यमंत्रीपदी येडियुराप्पाच राहतील. एवढेच नाही तर राज्यातील पुढील विधानसभा निवडणूकही राज्याचे मुख्यमंञी बीएस येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली होईल, असा अभिप्राय कर्नाटक राज्य सरकारचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव शंकरगौडा पाटील यांनी व्यक्त केला. सोमवारी सकाळी बेळगाव जिल्ह्यातील प्रधानमंत्री जनकल्याणकारी प्रचार-प्रसार अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शंकरगौडा पाटील बोलत होते. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना मुख्यमंञीपदावरून हटविण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा आहे. याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शंकरगौडा पाटील म्हणाले कि, हे शक्य नाही. माध्यमांकडून जे ऐकले जात आहे ते खोटे आहे. येडियुरप्पा आपल्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ पूर्ण करतील. पुढील तीन वर्षे तेच मुख्यमंत्री राहतील. कर्नाटक राज्याला सुवर्ण कर्नाटक राज्य बनवतील. राज्यातील प्रत्येक सामान्य माणसाला फायदा होईल असे प्रकल्प राबवण्याची त्यांची योजना आहे. पुढील निवडणूक येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालीच होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
पोटनिवडणूक तिकिटाबाबत ज्येष्ठ भाजप नेते घेतील निर्णय
बेळगावच्या लोकसभा पोटनिवडणुकीबद्दल बोलताना शंकरगौडा पाटील म्हणाले कि, आम्ही सर्वांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या कुटुंबियांना तिकीट मिळायला हवे असे सांगितले आहे. सुरेश अंगडी यांच्या पत्नींना आगामी लोकसभा पोटनिवडणुकीचे तिकीट मिळावे अशी माझी आणि आम्हा सर्वांचीच इच्छा आहे. अनेकांची नावे पुढे येत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी तसेच अन्य वरिष्ठ नेत्यांनी सुरेश अंगडी यांच्या कुटुंबातील सदस्याला तिकट द्यावे अशी मते व्यक्त केली आहेत. ते म्हणाले कि, आम्ही हायकमांडच्या निर्णयाशी वचनबद्ध आहोत. स्वतः मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अंगडी कुटुंबीयांची भेट घेतली आहे. तसेच दिल्ली येथे सुरेश अंगडी यांचे जे स्मारक उभारण्यात येणार आहे, त्या ठिकाणी मी आपल्या अभियंत्यांसह जाऊन भेट दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी अंगडी कुटुंबियांची भेट घेऊन चर्चा केली असली तरी तिकीट कोणाला द्यायचे याबाबतीत पक्षाचा निर्णय अंतिम असतो. स्वतः मुख्यमंत्री देखील हा निर्णय घेऊ शकत नाहीत, परंतु त्यांची अंगडी कुटुंबियांना सहानभूती आहे.
प्रकाश हुक्केरी यांच्या वक्तव्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शंकरगौडा पाटील म्हणाले कि, याबाबत सध्या सतीश जारकीहोळी यांनी उत्तर दिले आहे. प्रकाश हुक्केरी हे भाजपमध्ये प्रशेश करण्यासंबंधी ते म्हणाले कि, भाजप हा कोणा एका व्यक्तीचा पक्ष नाही. सामूहिक संघटना असलेला हा पक्ष आहे. राज्याध्यक्ष नलिनकुमार कटील, मुख्य सचिव संघटन महामंत्री अरुण तसेच वरिष्ठ नेते याबद्दल निर्णय घेतील असे सांगितले. काँग्रेसचे 5 आमदार भाजपमध्ये भाजपमध्ये प्रवेश करतील या उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया देताना शंकरगौडा पाटील यांनी सांगितले कि, सवदी यांनी जे सांगितलेले त्यात तथ्य आहे. केवळ काँग्रेसचं नाही तर विविध पक्षांचे नेतेही भाजपमध्ये सामील होतील. एकंदरीत, येडियुरप्पा आणखी 3 वर्ष मुख्यमंत्री राहतील, त्याचप्रमाणे बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचे तिकीट सुरेश अंगडी यांच्या कुटुंबियांना द्यावे असे मत शंकरगौडा पाटील यांनी व्यक्त केले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

मुख्यमंत्री येडीयुरप्पा मुख्यमंत्रीपदावरुन पायऊतार होणार नाहीत...
शंकरगौडा पाटील यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण... बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm