बेळगाव : स्टुडिओला लागलेल्या आगीत 5 लाखाचे नुकसान

बेळगाव : स्टुडिओला लागलेल्या आगीत 5 लाखाचे नुकसान

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील सदलगा येथे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत फोटो स्टुडिओतील साहित्य जळाले आहे. या आगीत 5 लाखाचे नुकसान झाले आहे. सदलगा बस स्थानक परिसरातील छञपती शिवाजी चौकातील महांत डिजिटल फोटो स्टुडिओ शॉर्ट सर्किटमुळे जळाला आहे. शनिवारी (ता. 24 ऑक्टोबर) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत फोटोग्राफीशी संबधित कॅमेरा, कंप्युटर, झेरॉक्स मशीन जळून खाक झाले.
यावेळी दुकानचालक सुरेश अल्लाई यांच्या समोर आगीत जळालेल्या साहित्याचा पंचानामा करण्यात आला. त्यावेळी दोन कंम्युटर, दोन झेरॉक्स मशीन, एक कलर झेरॉक्स मशीन, दोन कॅमेरे, फोटो कॉपीचे साहित्य, फर्निचर असे अंदाजे 4 ते 5 लाखांचे नुकसान झाल्याचे उघड झाले आहे. घटनास्थळी पीएसआय आर. वाय. बिळगी, हेडकॉन्स्टेबल जमादार, महसूल खात्याचे सलीम व अकबर सनदी यांनी भेट देऊन पंचनामा केला. सदलगा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : स्टुडिओला लागलेल्या आगीत 5 लाखाचे नुकसान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm