लवकरच देशात कोरोनाचं दहन?; गेल्या 99 दिवसांत जे घडलं नाही, ते घडलं

लवकरच देशात कोरोनाचं दहन?
;
गेल्या 99 दिवसांत जे घडलं नाही, ते घडलं

belgavkar.com | belgaum | belgavkar

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह

देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. मात्र अजूनही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. काल दिवसभरात 480 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या 99 दिवसांत पहिल्यांदाच इतक्या कमी मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना संकटाची तीव्रता काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे.  देशातील विविध भागांमध्ये कोरोनाचा वेग आटोक्यात येत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. सप्टेंबरच्या मध्यावर कोरोनानं देशात अक्षरश: थैमान घातलं होतं. 15 सप्टेंबरला देशात कोरोनामुळे 1 हजार 275 जणांचा मृत्यू झाला. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात येत आहे. काल देशात 480 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. गेल्या 99 दिवसांत प्रथमच इतक्या कमी प्रमाणात कोरोना रुग्ण दगावले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना मुंबईतील ब्रिज कैंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
महाराष्र्ट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील ब्रिज कैंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अजित पवार यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. 'आपली प्रकृती उत्तम असून विश्रांतीनंतर लवकरच आपल्यासोबत असेन,' असं अजित पवारांनी म्हटलं आहे. थकवा जाणवत असल्याने अजित पवार गेल्या चार दिवसांपासून होम क्वॉरन्टाईंन होते. यानंतर आज सकाळी ते ब्रीच कॅण्ड रुग्णालयात दाखल झाले. 'माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन,' असं अजित पवार यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार मागील आठवड्यात पुणे, इंदापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना थोडा थकवा जाणवत होता. तरीही त्यांनी शनिवारी (17 ऑक्टोबर) बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. हा दौरा आटोपून परतल्यानंतर त्यांना तापही आला होता. त्यामुळे कोरोना चाचणी केली. ती निगेटिव्ह आली असली तरी थकवा असल्याने त्यांनी घरीच राहून आराम करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आज त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.
देशात कोरोना बाधितांच्या संख्येत घट; मृत्यूचा आकडाही 500 च्या खाली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी कोरोना संदर्भात जाहीर केलेल्या आकडेवारीतून थोडा दिलासा मिळणार आहे, आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद 3 महिन्यांतील दैनंदिन रूग्ण संख्येच्या तुलनेत सर्वात कमी झाली आहे. इतकेच नव्हे तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही घट झाली आहे आणि दररोज होणाऱ्या कोरोनामुळे रुग्णांच्या मृत्यूची संख्या 500 वर आली आहे. तर देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रूग्णांच्या संख्येतही सातत्याने घट होत आहे, यासह दिलासादायक बाब म्हणजे रिकव्हरी रेटमध्ये वाढ होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात गेल्या 24 तासात 45 हजार 149 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली असून सध्या बाधितांचा आकडा 70 लाख 9 हजारांवर पोहोचला आहे. तर दिवसभरात 480 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमावलेल्यांचा आकडा 1 लाख 19 हजार 14 झाला आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असून सध्या 6 लाख 53 हजार 717 रूग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहे.
दरम्यान, देशात आतापर्यंत एकूण 71 लाख 37 हजार 229 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर दिवसभरात 59 हजारांहून अधिकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  देशात कोरोनाबाधित रूग्ण निदर्शनात येण्यासाठी कोरोना चाचणी अद्याप सुरूच आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत एकूण 10 कोटी 34 लाख 62 हजार 778 जणांचे नमुने तपासण्यात आले तर गेल्या 24 तासात 9 लाख 39 हजार 309 कोरोना चाचण्या झाल्याची माहिती ICMR ने दिली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

लवकरच देशात कोरोनाचं दहन?; गेल्या 99 दिवसांत जे घडलं नाही, ते घडलं
उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना पॉझिटिव्ह

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm