बेळगाव : काँग्रेसचे माजी खासदार भाजपकडून लढविण्यास इच्छुक - बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक

बेळगाव : काँग्रेसचे माजी खासदार भाजपकडून लढविण्यास इच्छुक - बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक

belgavkar.com | belgaum | belgavkar

नाहीतर अंगडी कुटुंबातील व्यक्तीला विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार

बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे दिवंगत खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लोकसभेची जागा रिक्त आहे. दरम्यान अंगडी यांच्या कुटुंबातील सदस्य प्रतिस्पर्धी नसल्यास आपण निवडणूक लढवणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी केले आहे. याचबरोबर हुक्केरी यांनी काँग्रेस किंवा भाजप कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे वक्तव्य केले आहे. अंगडी यांचे व आपले कौटुंबीक आणि जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे आपल्याला अतीव दुःख झाले आहे. त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला भाजपाने पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली, तर त्याच्या विजयासाठी मी सर्वस्व पणाला लावून प्रयत्न करणार आहे. असे करताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर काहीही कारवाई केली तरी त्याची मला पर्वा नाही. अंगडी यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त कोणालाही उमेदवारी देण्याचा प्रयत्न झाला तर आपण ज्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल, त्या पक्षाकडून बेळगाव लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे मत माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांनी काल व्यक्त केले.
केरूर (ता. चिक्कोडी) फाट्यानजीक नव्याने सुरू केलेल्या पेट्रोल पंपाच्या उदघाटन समारंभावेळी ते बोलत होते. हुक्केरी - चिकोडी मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे मोठे नेते म्हणून प्रकाश हुक्केरी ओळखले जातात. त्यांचे चिरंजीव गणेश हुक्केरी हे काँग्रेस पक्षाकडून आमदार आहेत. हुक्केरी यांचा पराभव आण्णासाहेब जोल्ले यांनी मागच्या खासदारकीवेळी केला होता. ते म्हणाले, काँग्रेस, भाजपने उमेदवारी दिली तरी ती स्वीकारण्यास मी तयार आहे. आपण प्रथम खासदार होऊन गेल्यानंतर तेथे दिल्लीतील सर्व माहिती सुरेश अंगडी यांच्याकडून मला मिळाली. सुरेश अंगडी भाजपत तर मी काँग्रेसमध्ये आहे. आम्हा दोघांच्यात घनिष्ट मैत्री होती. आज आपला मित्र नसल्याचे दुःख वाटते. सुरेश अंगडी कुटुंबातील कुणालाही तिकीट दिल्यास मी कोणत्याही पक्षाकडून तिकीट मागणार नाही. अंगडी कुटुंब वगळून इतर कुणालाही तिकीट दिल्यास मी निवडणूक लढण्यास तयार आहे. काँग्रेस असो किंवा भाजप कोणत्याही पक्षाकडून तिकीट दिल्यास निवडणूक लढविणार असल्याचे हुक्केरी यांनी सांगितले. पंतप्रधान कार्यालयात पोहचवण्यापर्यंत विकासकामे करण्यासाठी हातभार लावला. त्यामुळे उपकाराची परतफेड म्हणून त्यांच्या कुटुंबातील कोणालाही उमेदवारी मिळाल्यास माझ्या मुलाला निवडणूक विजयी केली त्याचपद्धतीने यश त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जर भाजपाने त्यांच्या कुटुंबातील कोणालाही उमेदवारी दिली नाही, किंवा इतर कोणत्याही पक्षांनी आपल्याला उमेदवारी दिल्यास आपण ती निवडणूक लढविण्यास सज्ज आहोत.
जिल्हा पालकमंत्री, विधान परिषद सदस्य म्हणून बेळगाव लोकसभा मतदारसंघात काम केले आहे. 2005 साली जिल्हा पालक मंत्री असताना त्या भागातील विकासकामे केली आहेत. बेळगाव येथे बिम्स वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणण्यासाठी आपणास केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांची मोलाची मिळाली होती. राज्यातील काँग्रेस नेते केवळ दिखावा करून दिवस काढत आहेत. राज्यातील भाजप सरकारने सर्व विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा निधी अडवून ठेवला आहे. निधी देण्यासाठी राज्य सरकारला जाब विचारायचा सोडून राज्यातील काँग्रेस पक्षश्रेष्ठी वेळकाढूपणाचे काम करीत आहेत, अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. यामुळे बेळगाव जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. प्रकाश हुकेरी भाजपात जाणार का अशी चर्चा सुरू आहे.
चिक्कोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी वाढीव निधी देण्याचे भाजपाने आमीश दिल्यास काय करणार, या प्रश्नावर ते म्हणाले, 'त्यांनी आजवर तशी ऑफर दिलेली मात्र दिली तरी त्याचा विचार करावा लागेल. तसेच बेळगाव येथील खासदारकीच्या पोटनिवडणुकीत आपल्याला जर काँग्रेसने किंवा भाजपने उमेदवारी दिली तरी आपण ती निवडणूक लढविण्यास उत्सुक आहोत. मग पक्षश्रेष्ठींनी कारवाई केली तरी मला त्याची पर्वा असणार नाही.'

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : काँग्रेसचे माजी खासदार भाजपकडून लढविण्यास इच्छुक - बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक
नाहीतर अंगडी कुटुंबातील व्यक्तीला विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm