बेळगाव जिल्ह्यातील 148 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसीन सुविधा

बेळगाव जिल्ह्यातील 148 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसीन सुविधा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव जिल्ह्यातील 148 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसीन सुविधा सुरू केली जाणार आहे. केंद्र शासनाच्या ई - हॉस्पिटल योजनेतून ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. इन्फर्मेशन ॲन्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज अर्थात आयसीटीचा वापर करून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक उपकरणांची खरेदी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून निविदा मागविण्यात आली आहे. टेलिमेडिसीन ही संकल्पना कोरोना काळात खूप महत्त्वाची ठरली. यापुढे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही ही सुविधा उपलब्ध असेल. रुग्णांना तातडीने उपचार उपलब्ध करून देणे, आरोग्यविषयक मार्गदर्शन करणे यासाठी ही संकल्पना फायदेशीर ठरणार आहे. पहिल्या टप्प्यात 148 प्राथमिक आरोग्य केंद्रांत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. -
डॉ. संजय डूमगोळ, आरोग्याधिकारी
आरोग्य केंद्रांसाठी उपकरणांच्या खरेदीला बेळगाव जिल्हा पंचायतीकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी 1 कोटी 4 लाख 30 हजार रुपये रक्कम राखीव ठेवण्यात आली आहे. ज्या 148 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसीन सुविधा उपलब्ध होणार आहेत, त्यांचे नियंत्रण येथील बिम्समधून केले जाणार आहे. त्याला हब सेंटर असे संबोधले जाते. सार्वजनिक आरोग्य सेवेत सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याकडून माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक नव्या योजना राबविल्या जात आहेत. आरोग्य विभागाकडून नॅशनल हेल्थ पोर्टलची निर्मिती केली आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून टोल फ्री क्रमांकावर नागरिकांना आरोग्याशी संबंधित माहिती दिली जाते. शिवाय मोबाईल अॅप्लिकेशन तयार करून त्या माध्यमातून आरोग्यविषयक माहिती व सल्ले दिले जात आहेत. ई - हॉस्पिटल ही संकल्पनाही राबविली आहे. त्यात माहिती तंत्रज्ञानाचा आधार घेऊन रुग्णांची नोंदणी, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. टेलिमेडिसीन ही संकल्पना गेल्या काही वर्षांपासून खासगी हॉस्पिटलनी अमलात आणली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णांना आरोग्यविषयक माहिती व सल्ला त्यातून दिला जातो.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव जिल्ह्यातील 148 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसीन सुविधा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm