बेळगाव : सुरत आणि अजमेर ही विमानफेरी सुरु होणार

बेळगाव : सुरत आणि अजमेर ही विमानफेरी सुरु होणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : उडान योजनेतून ( UDAN - 'Ude Desh ka Aam Nagarik') मंजुरी मिळालेले आणखी एक शहर बेळगावशी हवाई मार्गाने जोडणार आहे. स्टार एअर 10 नोव्हेंबरपासून बेळगाव - सुरत ही विमानफेरी सुरु करणार आहे. हीच फेरी किशनगड (अजमेर) पर्यंत विस्तारित केली आहे. हिवाळी हंगामाच्या वेळापत्रकात या फेरीसाठी डीजीसीएने (DGCA - Directorate General of Civil Aviation) परवानगी दिली आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशी आठवड्यातील 4 दिवस ही विमानफेरी सुरू राहणार आहे.
सुरतहून हेच विमान किशनगडला (अजमेर) जाणार आहे. गुजरात आणि राजस्थानला जाणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. तसेच पुष्कर आणि अजमेर या दोन धार्मिक स्थळांना जाणाऱ्या भाविकांसाठीही विमानसेवेचा पर्याय उपलब्ध झाला आहे.


बेळगावहून दुपारी 12 वाजता उड्डाण करणारे विमान दुपारी 1.20 वाजता सुरतला पोचेल.
सुरतहून सायंकाळी 5.30 वाजता सुटणारे विमान बेळगावला सायंकाळी 6.50 वाजता पोचणार आहे. मधल्या वेळेत हे विमान सुरत - किशनगड फेरी करणार आहे.
सुरतहून दुपारी 1.50 वाजता उड्डाण करणारे विमान दुपारी 3.10 वाजता किशनगडला पोचणार आहे. तेथून दुपारी 3.40 वाजता उड्डाण करणारे विमान सायंकाळी 5 वाजता सुरतला लँडिंग होणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : सुरत आणि अजमेर ही विमानफेरी सुरु होणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm