बेळगाव : अखंडित वेडात दौडणार्या श्री दुर्गामाता दौडीची विजयादशमीला यशस्वी सांगता

बेळगाव : अखंडित वेडात दौडणार्या श्री दुर्गामाता दौडीची विजयादशमीला यशस्वी सांगता

belgavkar.com | belgaum | belgavkar

धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे दौडीची सांगता

बेळगाव शहर आणि परिसरात नवरात्रोत्सवाच्या कालावधीत सुरु झालेल्या दुर्गामाता दौडीची सांगता दसऱ्या दिवशी झाली. बेळगावच्या श्री दुर्गामाता दौडमध्ये दरवर्षी हजारो तरुण, तरुणी भाग घेतात. माञ यंदा कोरोना व्हायरसच्या महामारीत साध्या पध्दतीने ही दौड श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्यावतीने काढण्यात येत आहे. चैतन्य निर्माण करणार्या या दुर्गामाता दौड कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी (25 ऑक्टोबर) ध्वजपथक व शस्ञपथाकातील धारकरी व जिल्हाप्रमुखांसह ही दौड काढण्यात आली.
शहरातील दौडला 23 वर्षांची अखंडित परंपरा - पाहा Video
रविवारच्या म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी दुर्गामाता दौड शहराच्या मध्यवर्ती भागातून निघाली. मारुती गल्ली येथील श्री मारुती मंदिरापासून या दौडीला प्रारंभ झाला. त्यानंतर विविध मार्गांवरून फिरून धर्मवीर संभाजी चौक येथे दौडीची सांगता झाली. माजी महापौर सरिता पाटील यांनी दौडीमध्ये सहभाग घेतला होता. छत्रपती शिवरायांचा तसेच देवी मातेचा जागर करीत ही दौड निघाली. यावेळी उपस्थित नागरिकांनी देखील घोषणांचा गजर केला. पारंपरिक पद्धतीने निघालेल्या या दौडीची सांगता सर्व नियमांचे पालन करून यशस्वीरित्या करण्यात आली
परमपविञ भगव्या ध्वजासह शस्ञपथकातील धारकर्यांचे मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने मार्गावर स्वागत करण्यात आले. यावेळी माजी महापौर सरिता पाटील, शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, विभागप्रमुख अनंत चौगुले, फेटे बांधणारे धारकरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. येथून दौडीची सुरुवात करून धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे दौडीची सांगता करण्यात आली. आरती व प्रेरणा मंत्र म्हणण्यात आले.

दरवर्षी हजारोंच्या संख्येने सहभागी होणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये कोरोनाचे संकट काही मोजकेच शिवप्रेमी सहभागी होते. तसेच फक्त काही ठराविक मार्गावरून दौड निघाली. नवरात्रोत्सवानिमित्त 9 दिवस शहरातील विविध भागांतून ही दौड काढण्यात येते. शिवप्रतिष्ठानतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या शहरातील दौडला 23 वर्षांची परंपरा आहे. सर्वच कार्यक्रमांना प्रशासनाची परवानगी नसल्यानामुळे श्री दुर्गामाता दौडीची परंपरा खंडीत होऊ नये म्हणून परमपविञ भगव्या ध्वजासह शस्ञपथकातील धारकरी या दौडीत सहभागी होते. दरवर्षी दौडीतील भगव्या ध्वजाचे मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने गल्लो-गल्लीत स्वागत करण्यात येते. दरवर्षी दौडीच्या मार्गावर फुलांचे सुशोभिकरण, स्वागत कमानी उभारून तरेच देखावे सादरीकरणाने मोठ्या भक्तीभावाने दौडीचे स्वागत करण्यात येते. यावर्षीची दुर्गामाता दौड अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येणार असल्याने दरवर्षी येणार्या खर्चाची तीच रक्कम किल्ले रायगडावर होणार्या छञपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनासाठी द्यावी असे आवाहन करण्यात आले होते.
दौडला सुरुवात झाल्यानंतर पहिली काही वर्षे शहराच्या काही भागात दौड काढली जात होती. मात्र त्यानंतर दौडचा विस्तार वाढत गेला अन् सध्या नवरात्रोत्सवानिमित्त 9 दिवस शहरातील विविध भागांतून ही दौड काढण्यात येते. शिवप्रतिष्ठानतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या शहरातील दौडला 23 वर्षांची परंपरा आहे. नवरात्रोत्सवामध्ये बेळगाव शहरासह उपनगरांमध्ये आणि ग्रामीण भागातही दुर्गामाता दौड काढली जाते. पहाटेच्यावेळी भगवे ध्वज, भगवे फेटे परिधान करुन तरुण आणि तरुणी उत्स्फुर्तपणे या दौडमध्ये भाग घेतात. मात्र कोरोनामुळे यावर्षीची दौड साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना देव, देश आणि धर्माच्या हितासाठी आजपर्यंत कार्य करत आली आहे. त्यामुळे देशासाठी आणि धर्मासाठी आम्ही ही दौड साध्या पध्दतीने काढणार असल्याचे सांगण्यात आले होते. शहरासह ग्रामीण भागातील सर्व तरुणांनी याला संमती दिली होती.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : अखंडित वेडात दौडणार्या श्री दुर्गामाता दौडीची विजयादशमीला यशस्वी सांगता
धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे दौडीची सांगता

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm