बेळगाव : कपिलेश्वर मंदिरात विजयादशमीला आकर्षक अशी आरास - खास Video

बेळगाव : कपिलेश्वर मंदिरात विजयादशमीला आकर्षक अशी आरास - खास Video

belgavkar.com | belgaum | belgavkar

विजया दशमी दसऱ्याच्या दिवशी फुलांची आकर्षक सजावट Photos

कपिलेश्वर मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त कपिलेश्वर मंदिरात आकर्षक सजावट
बेळगाव : दक्षिण काशी म्हणून परिचित असलेल्या कपिलेश्वर मंदिरात नवरात्रोत्सवात नवव्या दिवशी देवस्थान ट्रस्टतर्फे विजयादशमीचे औचित्य साधून आकर्षक अशी फुलांची आरास करून मंदिराचा गाभारा फुलांनी सजवण्यात आली आहे. शिवाजी पाटील नेहरूनगर, विनायक पालकर, पुजारी सचिन आनंदाचे यांनी विशेष परिश्रम घेऊन मंदिराचा गाभारा फुला पानांनी सजवलेला आहे.
दसऱ्यानिमित्त करण्यात आलेल्या सजावटीमुळे मंदिरातील गाभारा अधिकच खुलून दिसत आहे. शारदीय नवरात्रौत्सवाच्या नवव्या माळेला फुलांची आकर्षक अशी सजावटही करण्यात आली आहे. विजया दशमी दसऱ्याच्या दिवशी फुलांचे आणि आपट्याच्या पानांचे आधिक महत्व असते. यामुळे आज मंदिरात आणि गाभाऱ्यात फुले आणि आपट्यांच्या पानांची आकर्षक मनमोहक सजावट करण्यात आलेली आहे.
मंदिर आवारात 17 फुटी दक्षिण महाकाली रूपातील भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. बेळगावच्या कपिलेश्वर मंदिरात नवरात्री आणि दसरा सणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. बेळगावच्या कपिलेश्वर मंदिरात एकंदरीत नवरात्री आणि दसऱ्याच्या निमित्ताने दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कपिलेश्वर मंदिरात विजयादशमीला आकर्षक अशी आरास - खास Video
विजया दशमी दसऱ्याच्या दिवशी फुलांची आकर्षक सजावट Photos

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm