बेळगावात 15 डिसेंबरपासून सैन्यभरती MLIRC मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर

बेळगावात 15 डिसेंबरपासून सैन्यभरती MLIRC मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरकडून (Maratha Light Infantry Regimental Centre - MLIRC) डिसेंबर महिन्यात सैन्य भरतीचे (army recruitment) आयोजन करण्यात आले आहे. आरक्षण कोटा अंतर्गत खेळाडू व सेवारत तसेच माजी सैनिकांची मुले आणि बंधूंसाठी (UHQ Relation, Relation or Sports quota) ही भरती प्रक्रिया होणार आहे. मराठा इन्फंट्रीमध्ये रिक्त असलेल्या सैनिक सामान्य सेवा, ट्रेडमन, क्‍लर्क पदासाठी (Soldier GD/Tradesman/Clerk Bharti) ही भरती होणार आहे. 15 डिसेंबरपासून भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे.
Maratha Light Regt Centre Belgaum Army Bharti 15 DEC 2020 21 for GD/Clerk/Trades Recruitment Rally - UHQ Relation Army Bharti Rally
15 डिसेंबर - पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील खेळाडू
16 डिसेंबरला महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यातील खेळाडूंची भरती प्रक्रिया पार पडेल. आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी 17 पासून भरती सुरु होईल. पहिले दोन दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी भरती चालेल. तर 19 रोजी मध्यप्रदेश, गोवा, गुजरात, छत्तीसगढ, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील उमेदवार भाग घेऊ शकतात.


21 डिसेंबर रोजी सोल्जर ट्रेडमन पदासाठी केवळ महाराष्ट्रातील उमेदवारांना संधी असेल.
22 डिसेंबर रोजी महाराष्ट्र वगळता इतर राज्यातील उमेदवार भाग घेऊ शकतात.
23 डिसेंबर रोजी सोल्जर क्‍लर्क व स्टोअर किपर पदासाठी भरती होणार असून यात केवळ मराठा इन्फंट्रीत सेवा बजावणारे आणि निवृत्त जवानांच्या मुलांना भरतीची संधी असेल. 31 जानेवारी 2021 रोजी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा होणार आहे.
Starting Date : 15 DEC 2020
Rally Closing Date : 23 DEC 2020
Army Bharti Place : Chatrapati Shivaji Stadium, Maratha Li Regt Centre Belgaum स्थळ : छञपती शिवाजी महाराज स्टेडियम बेळगाव
Apply Mode : Offline report at the Maratha Li Regt Centre Belgaum
सामान्य सेवा भरतीसाठी उमेदवार 1 ऑक्‍टोबर 1999 पूर्वी आणि 1 एप्रिल 2003 नंतर जन्मलेला नसावा.
ट्रेडमन व क्‍लर्कसाठी 1 ऑक्‍टोबर 1997 पूर्वी व 1 एप्रिल 2003 पूर्वी जन्मलेला नसावा.
ही भरती केवळ राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळाडू, सैन्यात सेवा बजावणारे जवानांचे भाऊ, माजी सैनिकांची मुले, वीरपत्नींची मुले
यांच्यासाठी राखीव असून इतरांना यात भरतीची संधी नसेल. भरतीसाठी येणाऱ्या युवकांनी आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्रासह राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळाची प्रमाणपत्रे, माजी सैनिकांची मुले असल्यास रिलेशन प्रमाणपत्र, 25 पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, गुणपत्रिकांच्या झेरॉक्‍स प्रतीसह भरतीच्या ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात 15 डिसेंबरपासून सैन्यभरती MLIRC मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm