'स्कॅम 1992 द हर्षद मेहता स्टोरी' देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणारा शेअर बाजार घोटाळा

'स्कॅम 1992 द हर्षद मेहता स्टोरी' देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणारा शेअर बाजार घोटाळा

belgavkar.com | belgaum | belgavkar

मुंबईत फक्त चाळीस रुपये घेऊन आला अन् केला 5 हजार कोटींचा घोटाळा ?
'स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी'
ही वेब सीरिज सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी’ ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. 1992 मध्ये हर्षद मेहता याने बँकांच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून आणि भांडवल बाजारातील दलालांना हाताशी धरून देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणारा 700 कोटी रुपयांचा शेअर बाजार घोटाळा केला होता. त्यावरच या सीरिजचं कथानक आधारित आहे.
हर्षद मेहता अडकला अन् झुनझुनवाला ठरले 'बिग बुल'; दिवसाची कमाई तब्बल 5.6 कोटी
राकेश झुनझुनवाला हे नाव शेअर बाजारात रस असणाऱ्यांच्या परिचयाचं आहे. झुनझुनवाला नेमके कोणते शेअर्स विकत घेतात, कुठले शेअर्स विकतात, याची माहिती घेऊन निर्णय घेणाऱ्यांची संख्या कमी नाही. हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित स्कॅम 1992 ही वेबसीरिज सध्या प्रचंड चर्चेत आहे. सोशल मीडियावर स्कॅम 1992 ट्रेंडिंगमध्ये आहे. तुम्ही ही सीरिज पाहिली असल्यास तुम्हाला झुनझुनवाला यांचं नाव माहीत असेल.
मुंबईत फक्त चाळीस रुपये घेऊन आला अन् केला 5 हजार कोटींचा घोटाळा ?
अशी चर्चा आहे की, शाळेत जेमतेम असा विद्यार्थी असलेला हर्षद फारसा हुशार नव्हता. एकदा त्याला शाळेतून काढले देखील होते. त्यानंतर रायपूरहून काहीच वर्षात मुंबईतून शिक्षण घ्यायचं म्हणून खिश्यात चाळीस रुपये घेऊन तो मुंबईत B.com ही पदवी घेण्यासाठी आला. तसेही ही चाळीस रुपयांची रक्कम त्याकाळी काही कमी नव्हती. लाला लजपतराय कॉलेजातून त्याने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर हर्षदने कपडे आणि इलेक्ट्रिकल उपकरणं विकण्याची नोकरी केली. नंतर त्याने न्यू इंडिया अश्युरंस कंपनीत सेल्स पर्सन म्हणून नोकरी स्वीकारली. प्रचंड महत्वकांक्षी असणारा हर्षद मेहता कोणतिही रिस्क घ्यायला तयार असायचा. तो कोणतिही नवीन सिस्टम तात्काळ शिकून घ्यायचा.
शेअर बाजारातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार ही राकेश झुनझुनवाला यांची ओळख आहे. शेअर बाजारातून रग्गड कमाई करण्याचं स्वप्न हर्षद मेहतानं पाहिलं. ते काही प्रमाणात यशस्वीदेखील ठरलं. मात्र घोटाळा उघडकीस आला आणि हर्षद मेहता तुरुंगात गेला. मात्र राकेश झुनझुनवाला शेअर बाजारातले 'बिग बुल' ठरले. झुनझुनवाला यांना भारताचे वॉरन बफे म्हटलं जातं. फोर्ब्सच्या सर्वाधिक श्रीमंत भारतीयांच्या यादीत त्यांचा 54 वा क्रमांक आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगात हाहाकार उडाला. देशांच्या अर्थव्यवस्था रुळावरून घसरल्या. कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले. मात्र याच कालावधीत झुनझुनवाला यांनी 1 हजार 400 कोटी रुपये कमावले. झुनझुनवाला यांचे वडील आयकर अधिकारी होते. एका मध्यमवर्गीय कुटुंबात राकेश झुनझुनवाला यांचा जन्म झाला. महाविद्यालयात असतानाच त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 150 च्या आसपास असताना त्यांनी गुंतवणुकीत लक्ष घातलं. आजच्या घडीला हाच निर्देशांक 40 हजारांच्या घरात आहे. यावरून झुनझुनवाला यांच्याकडे किती मोठा अनुभव आहे, याचा अंदाज लावता येईल.
1986 ते 1989 या कालावधीत झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातील गुंतवणुकीतून 20 ते 25 लाखांची कमाई केली. तेव्हापर्यंत इतकी कमाई कोणलाही जमलेली नव्हती. हर्षद मेहता प्रकरण उजेडात आल्यानंतर झुनझुनवाला यांनी राधाकृष्ण दमानी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचंड कमाई केली. हर्षद मेहताच्या अटकेमुळे शेअर बाजारात एक मोठी आर्थिक पोकळी निर्माण झाली. ती झुनझुनवाला यांनी भरून काढली. गेल्या काही वर्षांपासून झुनझुनवाला यांनी टायटन, क्रिसिल, सेसा गोवा, प्राज इंडस्ट्रिज, ऑरोबिंदो फार्मा, एनसीसीमध्ये गुंतवणूक केली आणि देशातले सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार ठरले. रेअर इंटरप्रायझेस नावाची स्टॉक ट्रेडिंग फर्म चालवणाऱ्या झुनझुनवाला यांनी 2017 मध्ये एकाच सेशनमध्ये तब्बल 875 कोटी रुपयांची कमाई केली होती. हर्षद मेहता प्रकरणात सेबीनं कारवाई केली. त्यावेळी झुनझुनवालादेखील सेबीच्या स्कॅनरखाली होते असं बोललं जातं.
23 मार्चपासून झुनझुनवाला यांनी इस्कॉर्ट्स लिमिटेड नावाच्या एका कंपनीच्या माध्यमातून दर दिवसाला सरासरी तब्बल 5.56 कोटी रुपयांची कमाई केल्याचं वृत्त बिझनेस टुडेनं दिलं. शेअर्सची किंमत कमी असताना ते विकत घ्यायचे. कमी कालावधीसाठी नुकसान होत असलं तरी भविष्यातील फायदा पाहायचा. दीर्घकालीन विचार करायचा, हे झुनझुनवाला यांचं तत्त्व आहे. त्यामुळेच झुनझुनवाला काय करतात हे पाहून शेअर विकायचे की खरेदी करायचे याचा निर्णय घेणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे.
आठ वर्ष तो ठिकठिकाणी नोकरी करत होता. याच काळात त्याला शेअर मार्केटमध्ये आवड निर्माण झाली. नंतर काही शेअर दलालांकडे काम केल्यानंतर 1984 साली हर्षद मेहताने स्वतःची स्टॉक मार्केट ब्रोकरेज कंपनी 'ग्रो मोर रिसर्च अँड ऍसेट मॅनेजमेंट' सुरु केली. 23 एप्रिल 1992 चा दिवस त्याच्यासाठी काळा दिवस ठरला. त्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीने देशभरात खळबळ माजवली होती. ती बातमी 4000 कोटींचा घोटाळा उघड करणारी होती. घोटाळा झाला होता तो शेअर मार्केटमध्ये. ही बातमी ब्रेक केली होती ती पत्रकार सुचेता दलाल यांनी. त्या दिवशी हर्षद मेहता या नावाचा बोलबाला झाला. सरकारला काही सरकारी कामासाठी पैसे उभारायचे असल्यास ते बॉन्डद्वारे पैसे उभे केले जातात. सर्व बँकांना सरकारी बॉन्डमध्ये ठराविक रक्कम गुंतवणे बंधनकारक होते. सरकार बॉन्ड्स घेणाऱ्या सर्वांना काही व्याज ही देतं. जेव्हा एखाद्या बँकेला पैशांची गरज पडायची तेव्हा त्या बँकेकडे असलेले सरकारी बॉन्ड्स ती बँक दुसऱ्या बँकेला विकत असे आणि अल्पावधीसाठी काही व्याजदराने कर्ज घेत असे. पैसे आल्यावर पहिली बँक तो बॉन्ड दुसऱ्या बँकेकडून परत विकत घेत असे. ह्याला ब्रोकिंगच्या भाषेत रेडी फॉरवर्ड डील' असे म्हटले जायचे. अल्पावधीसाठी लागणाऱ्या पैश्यांची या प्रकारामुळे लगेचच सोय होत असे. याचाच फायदा हर्षद मेहताने घेतला आणि 4 हजार कोटींचा घोटाळा केला. ज्या बँकेला बॉन्ड्स विकायचे असायचे तिला ग्राहक म्हणजेच दुसरी बँक शोधण्याचे काम काही ब्रोकर्स करत असत. हर्षद मेहता तसाच एक ब्रोकर होता.
हर्षदला ही सर्व सिस्टीम बरोबर माहित होती. त्याने त्याचा फायदा घ्यायचे ठरवले. त्याचं झालं असं की जेव्हा बँकेला बॉन्ड विकायचा असायचा तेव्हा हर्षद मेहता मी तुम्हाला बॉन्ड घेणारी बँक शोधून देतो म्हणून तो बॉन्ड बँकेकडून घ्यायचा. तो बँकेला काही दिवसांचा वेळ ही मागून घ्यायचा. परत हर्षद बॉन्ड विकत घेणाऱ्या बँकेत जायचा अणि तुम्हाला विक्रेता शोधून आणतो म्हणून त्यांच्याकडून पैसे घ्यायचा परत त्या बँकेकडे देखील काही दिवसांचा कालावधी मागायचा. सरकार आपल्या योजनांसाठी भांडवल उभा करताना सरकारी बॉण्ड विक्रीसाठी उपलब्ध करतात. तेव्हाच्या राष्ट्रीय बँकांना अशा बॉण्डमध्ये गुंतवणूक करणे बंधनकारक होते. पैशांची गरज असेल तर बँका त्यांच्या ताब्यातील बॉण्ड पावतीच्या स्वरूपात दुसऱ्या बँकेकडे तारण ठेऊन व्याजावर पैसे घेत. नंतर व्याजावर घेतलेले पैसे परत करून बॉण्ड सोडवून घेत. याला रेडी फॉरवर्ड डील (आरएफ डील) म्हणतात. त्यासाठी अल्प मुदतीच्या कर्जासाठी दोन बँकांमध्ये सामान्यतः रेडी फॉरवर्ड डीलचा वापर व्हायचा. हर्षद मेहता मुंबई शेअर बाजारातील सर्वात मोठ्या घोटाळ्यासाठी कुख्यात आहे.
IMDb वर पहिल्या क्रमांकावर असल्याचं वृत्त एका वेबसाइटने दिलं. त्यावर ही माहिती खोटी असल्याचं ट्विट वेब सीरिजचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी केलं. वेब सीरिज पहिल्या नाही तर एकविसाव्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ‘हे खरं नाहीये. आमची वेब सीरिज एकविसाव्या क्रमांकावर आहे. या बातमीच्या आकडेवारीत चूक आहे’ असं त्यांनी लिहिलं. स्कॅम 1991 या वेब सीरिजला IMDb वर 9.0 रेटिंग असून ती टॉप 250 शोच्या यादीत 21 व्या स्थानी आहे. बीबीसीची प्लॅनेट अर्थ 2 ही पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर प्लॅनेट अर्थची बँड ऑफ ब्रदर्स, ब्रेकिंग बॅड, चर्नोबिल आणि द वायर हे शो आहेत. विसाव्या क्रमांकावर बेनेडिक्ट कंबरबॅचचा शेरलॉक आहे. द ट्वायलाइट झोन 22 व्या स्थानी आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

'स्कॅम 1992 द हर्षद मेहता स्टोरी' देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणारा शेअर बाजार घोटाळा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm