अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. चिकोडी : बोरगाव - इंचलकरंजी मार्गावर असलेल्या कर्नाटक प्रोसेस जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत झालेल्या अपघातात बोरगाव येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी (23 ऑक्टोबर) सायंकाळी 7 च्या सुमारास घडली. गुलाब सिकंदर मकानदार (वय 48, रा. बोरगाव, ता. चिकोडी) असे अपघातात ठार घालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. सदर घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यात झाली असून एस. सी. मठपती, एस. ए. गोडसे, बसवराज जेर्ली आदींनी पाहणी करून पंचनामा केला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, बोरगाव येथील मकानदार इंचलकरंजी - बोरगाव मार्गावर आयकोकडून बोरगावकडे दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. त्यात मकानदार यांचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघात ट्रॅक्टरच्या धडकेमुळे झाल्याचे घटनास्थळावर बोलले जात होते. त्यामुळे सदर वाहन कोणाचे याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. अपघातातील मृत मकानदार हे गवंडी काम करत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm