बेळगाव ता. खानापूर : ट्रान्स्फॉर्मरला स्पर्श झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी देवलत्ती येथे घडली. अर्जुन कल्लाप्पा इटगी (वय 65) असे त्याचे नाव आहे. घटनेची नोंद खानापूर पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, देवलत्तीत पाऊस झाला होता. सायंकाळी शिवारातील काम आटोपून अर्जुन घरी परतत होते. गावाजवळील ट्रान्स्फार्मरचा पाईप रस्त्याजवळ आला होता. तो जमिनीला टेकला आहे.
त्यातच टीसी पाईप लोंबकळून रस्त्याच्या बाजूला आला आहे. अर्जुन खड्डा चुकविताना त्यांच्या सायकलचा पाईपला स्पर्श झाला. ते सायकलसह उडून आपटले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिस आणि हेस्कॉम अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. अर्जुन यांच्या मागे पत्नी आणि मुलगा आहे. येथील सरकारी रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविला.