बेळगाव : बेपत्ता असलेला युवकाचा विहीरीत पडून मृत्यू झाल्याचा अंदाज

बेळगाव : बेपत्ता असलेला युवकाचा विहीरीत पडून मृत्यू झाल्याचा अंदाज

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : मागील तीन ते चार दिवसापासून पासून बेपत्ता असलेला युवक पप्पू अलका कांबळे (तो पहिल्यापासून आईचेच नाव लावत होता) (वय 25, रा . जत्राटवेस , निपाणी) हा युवक गुरुवारी (22 ऑक्टोबर) सकाळी बागवान गल्ली जवळील परदेशी मठा जवळील विहिरीत मृतावस्थेत आढळून आला. विहिरीत पाय घसरून पडल्याने पप्पूचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. घटनेची नोंदशहर पोलिस स्थानकात झाली आहे. सदर युवक बेपत्ता असल्यामुळे त्याचा शोध सर्व घरातील मंडळी व सामाजिक कार्यकर्ते व पोलिस यंत्रणा व निपाणी अग्निशामक दलाचे अधिकारी शोध घेत होते. या सर्व यंत्रणेला यश आले.
पण बेपत्ता तरुण पप्पू कांबळे हा बागवान गल्ली जवळील परदेशी मठाच्या नजीक असलेल्या  विहिरी मधून मृतावस्थेत काढल्यानंतर त्याच्या आईचा हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. सदरचा तरुण थोडा मनोरुग्ण असल्याचेही घटनास्थळावरून बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच निपाणी फायर स्टेशनचे एआय रुद्रगौडर व त्यांच्या टीमने रेस्क्यु ऑपरेशन करून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. सदर रेस्क्यू ऑपरेशनमध्ये त्या भागातील लोकांचा सहभाग लक्षणीय होता. त्यांच्या मदतीनेच घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदना साठी महात्मा गांधी रुग्णालयाकडे पाठवून दिला.
सदरच्या रस्क्यू ऑपरेशनमध्ये AFSTO ए. आय. रुद्रगौडर, एस बी हरिजन, लक्ष्मण शिरगावे, लकप्पा बऺजत्री, सचिन कट्टी यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सदर विहिरी मधून दोन ते तीन तास रेस्क्यू करून सदर मृतदेह बाहेर काढला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बेपत्ता असलेला युवकाचा विहीरीत पडून मृत्यू झाल्याचा अंदाज

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm