बेळगाव : ऑनलाइन शिकता यावं यासाठी नियतीने तिला दिला स्मार्टफोन...

बेळगाव : ऑनलाइन शिकता यावं यासाठी नियतीने तिला दिला स्मार्टफोन...

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : डाॅ. सोनाली सरनोबत यांनी नियती फाऊंडेशनच्या माध्यमातून चालू केलेले कार्य बेळगावकरांना चांगलेच परिचित आहे. नियती फाऊंडेशनतर्फे एका गुणी विद्यार्थीनीला आज स्मार्टफोन देण्यात आला. कोरोना व्हायरसच्या संकटात शाळा-कॉलेजही बंद आहेत. पण, ऑनलाईन क्लासद्वारे मुलांना शिक्षण दिले जात आहे. मात्र, त्यामुळे गरीब कुटुंबातील पालकांच्या समस्येत आणखी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत सरकार मुलांसाठी ऑनलाईन क्लासवर जोर देत असल्याचे चित्र बेळगावमध्ये दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थीनी 'कु. प्रणाली घाग'सारख्या गरीब कुटुंबीयांना आणखी संकटाचा सामना करावा लागत होता.
स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे विद्यार्थीनी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत असल्याने आणि शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी नियतीने पुढाकार घेतला आहे.  प्रणाली घाग हिला नियती फाऊंडेशनच्या वतीने स्मार्टफोन देण्यात आला. प्रणाली हिने नुकतीच बारावीची परिक्षा उत्तीर्ण केली आहे. तिला बीकॅाम. शाखेत प्रवेश घेऊन पुढील शैक्षणिक वाटचाल करावयाची आहे. पुढील शिक्षणासाठी तिला मोबाईलची गरज होती. डॉ. समीर सरनोबत व डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते मदतीचा मोबाईल सुपूर्द करण्यात आला.
तिची आई घरगुती रोजंदारी कामे करते व वडील सेंट्रींगच काम करतात. तिला पुढील वाटचालीस Niyati Foundation च्या वतीने smartphone उपलब्ध करुन देण्यात आला आणि डाॅ. सरनोबत दांपत्यांकडुन शुभेच्छा देण्यात आल्या


हुशार व गरजू विद्यार्थिनींकरीता नियतीची शिष्यवृत्ती योजना उपलब्‍ध आहे. त्‍याकरीता हुशार व गरजू विद्यार्थ्यांनी मदतीसाठी अर्ज करायचा असून, पडताळणीनंतर मदत केली जाते.
Photo : मोबाईल देताना डॉ. सोनाली सरनोबत व डॉ. समीर सरनोबत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : ऑनलाइन शिकता यावं यासाठी नियतीने तिला दिला स्मार्टफोन...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm