#BoycottSurfExcel हॅशटॅग... ची viral जाहिरात....

#BoycottSurfExcel हॅशटॅग... ची viral जाहिरात....

belgavkar.com | belgaum | belgavkar

‘हिंदुस्तान युनिलिव्हर’च्या मालिकीच्या असणाऱ्या ‘सर्फ एक्सेल’
या पावडर कंपनी विरुद्ध ‘सर्फ एक्सेल’चे प्रोडक्ट वापरू नका अशा अर्थाचा
#BoycottSurfExcel
हा हॅशटॅग ट्विटवर ट्रेण्ड होताना दिसत आहे. होळी स्पेशल जाहिरातीमधून एकटेच संदेश देण्याचा प्रयत्न केला. मात्र आता याच जाहिरातीवरुन
हिंदू मुलगी आणि मुस्लीम मुलगा
या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आल्याने अनेकांनी या जाहिरातीवर आक्षेप नोंदवला आहे.
‘सर्फ एक्सेल’ने होळीनिमित्त ‘रंग लाए संग’ या कॅप्शनसहीत एक जाहिरात तयार केली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून हिंदू मुस्लीम एकतेचा संदेश देण्याचा कंपनीने प्रयत्न केला आहे.


काय आहे जाहिरातीमध्ये

या जाहिरातीमध्ये सफेद रंगाचे कपडे घालून एक लहान मुलगी होळीच्या दिवशी आपल्या परिसरामध्ये सायकलवरुन फेर फटका मारताना दाखवली आहे. या मुलीवर गल्लीमधील अनेक लहान मुले रंगाचे फुगे मारताना दिसतात. संपूर्ण परिसरात फिरुन झाल्यावर ही मुलगी एका इमारती समोर येऊन आपल्या मुस्लीम मित्राला हाक मारुन बाहेर बोलवते. ‘ये बाहेर सर्वांकडचे रंग संपले आहेत,’ असं सांगताच एक लहान मुलगा पांढरे कपडे घालून नमाज पठणासाठी मशिदीमध्ये जाण्यास घराबाहेर पडतो. ही मुलगी त्याला सायकलवरुन मशिदीपर्यंत सोडते. मशिदीच्या पायऱ्या चढताना ती मुलगी त्याला ‘नंतर रंग लावणार’ असं सांगते. यावर तो मुलगाही नाजूक हसतो.
या जाहिरातीच्या शेवटी कंपनीची लोकप्रिय टॅगलाइन ‘दाग अच्छे हैं’ सुद्धा दाखवण्यात आली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

#BoycottSurfExcel हॅशटॅग... ची viral जाहिरात....

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm