बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक | चर्चा सुरू असली तरी काँग्रेसचा उमेदवार...

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक | चर्चा सुरू असली तरी काँग्रेसचा उमेदवार...

belgavkar.com | belgaum | belgavkar

आमदारांचे उमेदवारीसंदर्भात भाष्य

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार हायकमांडचा आहे. ते याबाबत निर्णय घेतील. याबाबत काहीही माहिती नसल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पत्रकारांना सांगितले. काँग्रेस भवनमध्ये पत्रकारानी त्यांची भेट घेतली असता त्या बोलत होते. आमदार हेब्बाळकर म्हणाल्या, बेळगाव पोटनिवडणुकीसंदर्भात चर्चा सुरू असली तरी काँग्रेसचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार हायकमांडच्या आहे. ते याबाबत योग्य वेळी आपला निर्णय जाहीर करतील.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार दिवंगत सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या उमेदवारीबाबत उद्याप निर्णय झालेला नाही. बेळगावात काही दिवसांपासून सुरेश अंगडी यांचे वारसदार कोण, याची चर्चा सुरु आहे. भाजप व काँग्रेसतर्फे कोणाला उमेदवारी मिळेल याचे आराखडे बांधले जात आहेत. या दरम्यान आमदार हेब्बाळकर यांनी उमेदवारीसंदर्भात मोठे भाष्य केले आहे.
उत्तर कर्नाटकमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण आणि मदत देण्यामध्ये राज्या सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यांचे प्रभारी मंत्री ही पूरग्रस्त भागाला भेट देण्यास आलेले नाहीत. त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. विरोधी पक्षात असूनही काँग्रेस सध्या सत्तारूढ गटाची कामे करत आहे. लोकांना मदतीचे काम काँग्रेसकडून सुरू आहे. काँग्रेसने सुरू केलेले अनेक लोकोपयोगी कामे सध्या भाजप सरकार बंद पाडत आहे. मोदी सरकारने जाहीर केलेली 20 लाख कोटीची मदत कुठे गेली, हे त्यांनाच विचारा. त्याचबरोबर किती जिल्ह्यामध्ये किती निधी मिळाला, हे त्यांनाच माहिती, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुक | चर्चा सुरू असली तरी काँग्रेसचा उमेदवार...
आमदारांचे उमेदवारीसंदर्भात भाष्य

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm