बेळगाव : 'नियती'तर्फे विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती Niyathi Foundation

बेळगाव : 'नियती'तर्फे विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती Niyathi Foundation

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : डाॅ. सोनाली सरनोबत यांनी नियती फाऊंडेशनच्या माध्यमातून चालू केलेले कार्य बेळगावकरांना चांगलेच परिचित आहे. नियती फाऊंडेशनतर्फे सिद्धार्थ सरोळकर या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या, सध्या शाळा सुरू नसल्या तरी घरातून अभ्यास सुरू आहे. सिद्धार्थ हा गुणवंत विद्यार्थी असून त्याच्या पुढील शिक्षणासाठी आर्थिक पाठबळाची गरज होती. पालकांकडून जे अर्ज येतात, त्यातून मुलाखती घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येते, अशी माहिती दिली.
डॉ. समीर सरनोबत व डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते सिद्धार्थ याच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. हुशार व गरजू विद्यार्थिनींकरीता ही शिष्यवृत्ती योजना उपलब्‍ध आहे. त्‍याकरीता हुशार व गरजू विद्यार्थ्यांनी मदतीसाठी अर्ज करायचा असून, पडताळणीनंतर मदत केली जाते.
Photo : सिद्धार्थ सरोळकर याला मदतीचा धनादेश देताना डॉ. सोनाली सरनोबत व डॉ. समीर सरनोबत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 'नियती'तर्फे विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती Niyathi Foundation

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm