honour-killing-teenager-was-killed-by-her-own-father-and-2-cousins-brother-in-ramanagara-karnataka-20201017.jpg | आंतरजातीय प्रेमसंबंधांतून पोटच्या मुलीची हत्या करून मृतदेह पुरला शेतात; वडिलांसह दोन  भावांना अटक - ऑनर किलिंग | belgaum news | belgavkar बेळगावकर

आंतरजातीय प्रेमसंबंधांतून पोटच्या मुलीची हत्या करून मृतदेह पुरला शेतात; वडिलांसह दोन भावांना अटक - ऑनर किलिंग

belgavkar.com | belgaum | belgavkar

आंतरजातीय प्रेमसंबंधातून पोटच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह शेतात पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना रामनगर (Ramanagara) जिल्ह्यातील बट्टेहळ्ळी गावात घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी मृताच्या वडिलांना (कृष्णाप्पा वय 48) आणि तिच्या दोन चुलत भावांना (योगेश वय 21 आणि एक अल्पवयीन भाऊ) अटक केली आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हत्येच्या दुसऱ्या दिवशी आरोपींनी तरूणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. मात्र, तरूणीची आंतरजातीय प्रेमसंबंधातून हत्या करण्यात आली आहे, असे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर या हत्येमागचे गूढ उकलले.
19 वर्षीय मृत तरूणी हेमलथा ही बी. कॉमच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. मात्र, तिचे दुसऱ्या पुनीथ या दुसर्या जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. याच रागातून तरूणीच्या वडिलांनी आणि दोन चुलत भावांनी मिळून 8 ऑक्टोबर रोजी तिची हत्या केली. त्यानंतर 9 ऑक्टोबरला तरूणीच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार नोंदवल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 ऑक्टोबरला तक्रारदाराच्या भावाच्या शेतात मुलगी मृतावस्थेत आढळली. कुटुंबासमोर मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुलीच्या पालकांच्या चेहऱ्यावर कुठलेही दु:खाचे भाव दिसले नाहीत. यामुळे पोलिसांना वेगळाच संशय आला आणि त्यांनी कसून चौकशीला सुरुवात केली. त्यानंतर हे ऑनर किलिंगचे प्रकरण असल्याचे समोर आले, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सीमंत कुमार सिंह यांनी दिली आहे. 

या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ऑनर किलिंगच्या सारख्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहेत. यात वरील घटनेने आणखी भर टाकली आहे. महत्वाचे म्हणजे, शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात ऑनर किलिंगच्या अधिक घटना घडत असल्याचे पाहायला मिळाले आहे.