belgaum-gokak-road-accident-three-death-belgaum-gokak-202010.jpg | ट्रॅक्टर-दुचाकी-क्रुझरच्या अपघातात तीन ठार. | belgaum news | belgavkar बेळगावकर

ट्रॅक्टर-दुचाकी-क्रुझरच्या अपघातात तीन ठार.

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : गोकाक तालुक्यातील जत-जांबोटी राज्य महामार्गावरील संगणेकेरीजवळ शनिवारी (17 ऑक्टोबर) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी व पाच महिन्याचा मुलगा जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. गोकाक-अथनी मार्गावर उसाने भरलेल्या ट्रॅक्टर-दुचाकी-क्रुझरच्या हा भीषण अपघात झाला. यात पती-पत्नी मुलासह दुचाकीवरून (KA 23 R 9860) जात असताना हा अपघात घडला. घटप्रभा पोलिस पुढील तपास करत आहेत.
अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीसह पाच महिन्याचे बाळ जागीच ठार

सदाशिव गाणगेर (32) व सखुबाई गाणगेर (28, दोघेही रा. हिडकल, ता. रायबाग) व त्यांची पाच महिन्यांची मुलगी द‍ृष्टी यांचा मृतांमध्ये समावेश आहे. हिडकल येथील पती-पत्नी शुक्रवारी हुक्केरी येथील पाहुण्यांकडे गेले होते. शनिवारी दुपारी ते आपल्या बाळासह कल्लोळीमार्गे हिडकलला दुचाकीवरून निघाले होते. यावेळी समोरून येणार्‍या उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्यासाठी क्रूझर भरधाव निघाली होती.
परंतु, ती पुढे जाण्याऐवजी बाजूने निघालेल्या दुचाकीला क्रूझरची धडक बसली. यामध्ये दुचाकी रस्त्यावर कोसळल्याने तिघेही रस्त्यावर पडले. तिघांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच ठार झाले. सोबत असलेली पिशवी व त्यामध्ये असलेली बाळाची खेळणी दिसत होती.