belgaum-durgamata-daud-shivpratishthan-hindusthan-belgaum-corona-pandemic-simple-manner-1st-day-Belgaum-202010.jpg | बेळगाव : वेडात धारकरी वीर दौडले 7; बेळगाव शहरात साधेपणाने उत्साहात दुर्गामाता दौड | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : वेडात धारकरी वीर दौडले 7; बेळगाव शहरात साधेपणाने उत्साहात दुर्गामाता दौड

belgavkar.com | belgaum | belgavkar

श्री दुर्गामाता दौडीची परंपरा अखंडित Video

बेळगाव :
भगव्या ध्वजधारकासह शस्ञपथकच दौडीत
बेळगावची दुर्गामाता दौड एक ऐतिहासिक दौड आहे. या दौडमध्ये दरवर्षी हजारो तरुण, तरुणी भाग घेतात. नवरात्रोत्सवात 9 दिवस ही दौड चालते. मात्र यावर्षी कोरोना व्हायरसमुळे साध्या पध्दतीने ही दौड काढण्याचा निर्णय श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्यावतीने घेण्यात आला होता. पहिल्याच दिवशीच शहर आणि परिसरात चैतन्य निर्माण करणार्या या दुर्गामाता दौडीत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 7 धारकर्यांच्या उपस्थितीत ही दौड काढण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटामुळे फक्त 7 जणांची दौडमध्ये उपस्थिती असली तरी शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात दौड काढण्यात आली.
7 धारकरी
1. सचिन पिराजी बाळेकुंद्री
2. प्रशांत पुंडलिक कलखांबकर
3. प्रदीप काशीराम जुवेकर
4. बसवंत नारायण पाटील
5. यल्लप्पा भरमा मरुचे
6. राहुल लाड
7. जिल्हाप्रमुख कीरण गावडे
प्रारंभी छञपती शिवाजी महाराज उद्यानातील शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी शिवप्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरवर्षी हजारोंच्या संख्येने सहभागी होणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये कोरोनाचे संकट काही मोजकेच शिवप्रेमी सहभागी होते. तसेच फक्त काही ठराविक मार्गावरून दौड निघाली आहे.
एसपीएम रोड येथील शिवाजी उद्यान येथून सुरुवात करून कपिलेश्वर मंदिर येथे दौडीची सांगता करण्यात आली. यावेळी आरती व प्रेरणा मंत्र म्हणण्यात आले. यावेळी खडेबाजारचे सीपीआय धीरज शिंदे यांच्या हस्ते दौडीचा ध्वज उतरवण्यात आला.
सर्वच कार्यक्रमांना प्रशासनाची परवानगी नसल्यानामुळे श्री दुर्गामाता दौडीची परंपरा खंडीत होऊ नये म्हणून परमपविञ भगव्या ध्वजासह शस्ञपथकातील धारकरी या दौडीत सहभागी होते. दरवर्षी दौडीतील भगव्या ध्वजाचे मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने गल्लो-गल्लीत स्वागत करण्यात येते. दरवर्षी दौडीच्या मार्गावर फुलांचे सुशोभिकरण, स्वागत कमानी उभारून तरेच देखावे सादरीकरणाने मोठ्या भक्तीभावाने दौडीचे स्वागत करण्यात येते. यावर्षीची दुर्गामाता दौड अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येणार असल्याने दरवर्षी येणार्या खर्चाची तीच रक्कम किल्ले रायगडावर होणार्या छञपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण सिंहासनासाठी द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
दुर्गामाता दौड - शनिवार 17 ऑक्टोबर ते रविवार 25 ऑक्टोबर
ह्यावर्षी दौड फक्त मुख्य मार्गावरून जाणार आहे. प्रत्येक गल्लीतुन दौड जाणार नाही. त्यामुळे यंदा ध्वजधारकासह 5 ते 10 कार्यकर्तेच दौडमध्ये सहभागी असणार

रविवार 18 ऑक्टोबर : श्री गणेश मंदिर - राणी चन्नम्मा सर्कल, आरटीओ सर्कल ते किल्ला दुर्गामाता मंदिर

सोमवार 19 ऑक्टोबर : श्री बसवाणा मंदिर - नेहरूनगर, नेहरूनगर दूसरा क्राॅस, रामदेव हाॅटेल रोड, श्री दुर्गामाता चौक, शिवबसवनगर ते जोतीबा देवस्थान मंदिर - शिवबसवनगर

मंगळवार 20 ऑक्टोबर : श्री शिवाजी काॅलनी - टिळकवाडी, पहिले रेल्वे गेट, देशमुख रोड, आरपीडी क्राँस, खानापूर रोड, अनगोळ क्राँस, अनगोळ रोड, हरी मंदिर रोड, श्री धर्मवीर संभाजी महाराज चौक, भांदूर गल्ली क्राँस ते महालक्ष्मी मंदिर - अनगोळ

बुधवार 21 ऑक्टोबर : श्री शिवतीर्थ - मिलीट्री महादेव मंदिर, काँग्रेस रोड, गोगटे सर्कल, खानापूर रोड, संचयनी सर्कल, श्री धर्मवीर संभाजी महाराज चौक, काॅलेज रोड, यंदे खूट, समादेवी गल्ली ते मारूती मंदिर - संयुक्त महाराष्र्ट चौक

गुरुवार 22 ऑक्टोबर : श्री अंबाबाई मंदिर - शहापूर, नाथ पै सर्कल, कंकणवाडी हाॅस्पिटल रोड, गोवावेस रोड ते बसवेश्वर चौक - गोवावेस

शुक्रवार 23 ऑक्टोबर : श्री दुर्गामाता मंदिर - बसवेश्वर सर्कल खासबाग, बाझार गल्ली वडगाव, हरी मंदिर रोड, विष्णू गल्ली वडगाव ते मंगाई देवस्थान - वडगाव

शनिवार 24 ऑक्टोबर : श्री सोमनाथ मंदिर - ताशीलदार गल्ली, हेमु कलानी चौक, स्टेशन रोड ते शनि मंदिर

रविवार 25 ऑक्टोबर : श्री मारूती मंदिर - मारूती गल्ली, बसवाण गल्ली, रामलिंग खिंड गल्ली ते श्री धर्मवीर संभाजी महाराज चौक
कोरोनाच्या संकटामुळे ध्वजधारक, शस्त्रधारक व इतर मोजकेच कार्यकर्ते दौडमध्ये असतील.
प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष देत यंदा परंपरा खंडित होऊ नये यासाठी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दुर्गामाता दौड निघणार आहे.