बेळगाव : खानापूर-अळणावर मार्गावर अपघातात एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी

बेळगाव : खानापूर-अळणावर मार्गावर अपघातात एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : खानापूर-अळणावर मार्गावरील बेकवाडनजीक दुचाकीला क्रुझरने ठोकरल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार तर त्यांचा पुतण्या जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव ठकू लखू यमकर (वय 60) असे असून गंभीर जखमीचे नाव जानू यमकर (वय 44) असे आहे. हे दोघेही चंदगड तालुक्यातील कानूरजवळील केरल्याचावाडा येथील रहिवासी आहेत. त्या दोघांसह आणखी दोघे दुसर्या दुचाकीवर स्वार होते. त्यांच्याही दुचाकीला गाडी धडकली, पण ते किरकोळ जखमी झाले.
ते चौघेही कडकेखेरे गवळीवाडा (तब्बल 110 किमी प्रवास) येथे आपल्या नातेवाईकांकडे दिवस कार्यासाठी गेले होते. परत आपल्या गावी जात असताना कोनकीकोप्प फाट्यावर या क्रुझरने प्रथम समोरुन चालवत असलेल्या दुचाकीला व नंतर त्या पाठोपाठ येणार्या दुचाकीलाही धडक दिली. यामध्ये ठकू यांच्या डोकीला गंभीर इजा झाल्याने तो जागीच ठार झाला. तर त्यांच्या मागे बसलेला जानू हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी बेळगावच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दुसर्या दुचाकीवरील दोघेही किरकोळ जखमी असल्याने त्यांच्यावर खानापुरातील दवाखान्यात उपचार करण्यात आले. या अपघाताची नंदगड पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : खानापूर-अळणावर मार्गावर अपघातात एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm