बेळगाव : जिल्हा पंचायत स्थायी समिती निवडणूक - 'या' सभासदत्वाची निवड झाली...

बेळगाव : जिल्हा पंचायत स्थायी समिती निवडणूक - 'या' सभासदत्वाची निवड झाली...

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : जिल्हा पंचायतीच्या विविध स्थायी समित्यांच्या सभासदत्वाची निवडणूक शुक्रवारी पार पडली. तब्बल सहा महिन्यानंतर झालेल्या जिल्हा पंचायत स्थायी समिती निवडणुकीबाबत सदस्यांत उत्सुकता दिसून आली. जिल्हा पंचायतीच्या सभागृहात सकाळी 10.30 वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आणि सदस्यांची निवड बिनविरोध झाली.
जिल्हा स्थायी समितीच्या सदस्यांची एकमताने बिनविरोध निवड
जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी, राज्यसभा सदस्य ईराण्णा कडाडी, अध्यक्ष आशा एहोळे आणि एमएलसी प्रो. सबन यांच्या उपस्थितीत निवड झाली. ऊपसचिव एस. बी. मुल्लाल्ली यांनी नव्याने निवडलेल्या स्थायी समिती सदस्यांची नावे जाहीर केली.
निवड खालीलप्रमाणे आहे :
सामान्य, अर्थ आणि लेखा
अध्यक्ष - आशा ऐहोळे
सदस्य - जितेंद्र मादार, गुराप्पा दाश्याळ, कृष्णाप्पा लमाणी, देशपांडे रमेश भिमशी, अनिल म्याकलमर्डी, शिवगंगा गोरवनकोळ्ळ


शिक्षण आणि आरोग्य
सदस्य : सुरेखा नाईक, लुक्ष्मी कुरबेर, बसवराज बंड्डीवड्डर, मल्लप्पा हिरेकुंबी, पवार राजेंद्र रामप्पा, सिद्धप्पा अप्पन्ना मदकन्नावर, शशिकला सन्नक्की


कृषी आणि सामाजिक न्याय
सदस्य : माधुरी शिंदे, अजित देसाई, सुमन पाटील, निंगप्पा पकांडी, लावण्या शिलेदार, मिनाक्षी जोडट्टी, निंगप्पा अरकेरी
सामान्य न्याय
अध्यक्ष : जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे
सदस्य : महांतेश मगदूम, सरस्वती पाटील, सिद्दू नराटे, सुदर्शन खोत, सुजाता चौगुले, कस्तुरी कमती


या निवडणुकीत 1 जागा भाजपाला तर 2 जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. तर अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनाही समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे.
जिल्हा पंचायत काँग्रेसच्या ताब्यात होती. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष काँग्रेसचे असले तरी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला असल्यामुळे त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार होती. जारकीहोळी भाजपमध्ये समाविष्ट झाल्यानंतर जिल्हा पंचायतीत काही प्रमाणात हालचाल सुरू झाली होती. त्यामुळे स्थायी समितीच्या निवडणुकीत काय होणार याकडे लक्ष लागून होते. सामान्य, अर्थ आणि लेखा, शिक्षण आणि आरोग्य, कृषी आणि सामाजिक न्याय या स्थायी समित्यांसाठी निवडणूक झाली आहे. मार्चमध्ये होणारी ही निवडणूक कोरोना महामारी प्राणी लॉकडाऊनमुळे लांबणीवर पडली होती . आज शुक्रवारची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : जिल्हा पंचायत स्थायी समिती निवडणूक - 'या' सभासदत्वाची निवड झाली...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm