बेळगाव : खानापूर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर

बेळगाव : खानापूर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : खानापूर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. आता ही निवडणूक बुधवार 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
सकाळी 10.30 ते 1 यावेळेत उमेदवारी अर्ज यानंतर लगेचच उमेदवारी अर्जाची छाननी व दुपारी 3 वाजता निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. खानापूर नगराध्यक्षपद उपनगराध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी ठेवण्यात आले आहे.
खानापूर नगरपंचायतीची निवडणूक 31 ऑगस्ट 2018 रोजी झाली होती. तर निवडणूक निकाल 3 सप्टेंबर 2018 रोजी लागला होता. पण गेले 24 महिने वेगवेगळ्या कारणांमुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली नव्हती. निवडणूक जाहीर झाल्याने आता राजकीय हालचालींना वेग आला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : खानापूर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm