बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीची निवडणूक बिनविरोध

बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीची निवडणूक बिनविरोध

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर करताच विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. दर 5 वर्षांनी तालुका मार्केटिंग सोसायटीची निवड मोठ्या चुरशीने होते. यावेळीही अ वर्गातून निवडून येणाऱ्या 9 जागांसाठी 18 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते ; तर इतर वर्गातील 6 जागांसाठी 13 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे निवडणूक होणार की बिनविरोध, याकडे लक्ष राहून राहिले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून अर्ज माघारीसाठी प्रयत्न केले जात होते. याला प्रतिसाद देत अ वर्गासाठी अर्ज केलेल्या 18 पैकी 9, तर इतर गटातील 13 पैकी 7 जणांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्यास मदत झाली.
निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक गोडपन्नावर यांनी काम पाहिले.
बिनविरोध विजयी झालेले उमेदवार असे
अ वर्ग : असिफ मुल्ला (मारिहाळ), निंगाप्पा नायक (बोडकेनहट्टी), प्रमोद पाटील (बसवन कुडची), महांतेश अलाबादी (बडस खुर्द), राजेंद्र अंकलगी (बडाल अंकलगी), विनय कदम (मण्णूर), विरुपाक्षी मज्जगी (हुदली), शंकरगौडा पाटील (विरसीनकोप्प), सुरेश सावंत (बेकिनकेरे)


ब वर्ग महिला गट : नागरत्ना शिंत्री (हिरेबागेवाडी), लक्ष्मी सोनजी (सांबरा)
ओबीसी अ वर्ग : शिवनगौडा पाटील (विरपनकोप्प)
ओबीसी ब नंदी उळवप्पा (हिरेबागेवाडी)
अनुसूचित जाती दिलीप कांबळे (हंगरगा) अनुसूचित जमाती : लक्ष्मण नायक.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव तालुका मार्केटिंग सोसायटीची निवडणूक बिनविरोध

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm