बेळगाव : कार्य 'Facebook Friend Circle'चे - दुर्गम आणि जंगल भागात राहणार्या कुटुंबांना मदत

बेळगाव : कार्य 'Facebook Friend Circle'चे - दुर्गम आणि जंगल भागात राहणार्या कुटुंबांना मदत

belgavkar.com | belgaum | belgavkar

एकदा Photos पहाच - तुम्हाला सामाजिक कार्याची जाणीव होईल

बेळगाव : खानापूर तालुक्यातील खानापूर - जांबोटी रस्त्यावर असलेल्या हरसनवाडी गावच्या हद्दीमध्ये कातकरी समाजाचे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून वास्तव्यास आहेत. या वसाहतीत जवळपास 80 लोकवस्ती आहे. पण सर्व लोक आदिवासीप्रमाणे जीवन जगत असून त्यांना प्रशासनाकडून कोणतीही मदत किंवा दिलासा मिळत नाही, ते अत्यंत कठीण जीवन जगत आहेत. या वसाहतीकडे बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलने लक्ष वेधले. आणि Facebook Friend Circle ने तातडीने येऊन या वसाहतीमधील सर्व कुटुंबांना मदत करून मोठा आधार दिला आहे.

या वसाहतीमधील जनतेला आधार देण्यासाठी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी नुकतीच या वसाहतीला भेट दिली. त्यांना तांदूळ व रेशनचे वितरण केले , एवढ्यावरच न थांबता जंगलात अनवाणी वाटा तुडवणाऱ्या लहान मुलांचे हाल लक्षात घेऊन 50 मुलांना चप्पल वितरित केले.

सोलारवरील बॅटरी, स्वयंपाकची भांडी व कपडे देण्यात आले. या मुलांना शैक्षणिक साहित्य पुरविण्याचा निर्धारही केला आहे. याकामी दरेकर यांच्यासह अमित परमेकर, महाराष्र्ट एकीकरण युवा समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, संप्रीत जोशी, प्रशांत बिरजे यांच्यासह दानशूर मंडळीचे सहकार्य लाभले. वीजपुरवठा नाही, पाणी आणण्यासाठी दीड किलोमीटरची रोजची पायपीट, मुलांच्या अंगावर घड कपडे नाहीत, पायात चप्पल नाहीत, बाजूच्या गावातील शाळेत जंगलातून जीवमुठीत घेऊन करावी लागणारी ये - जा अशा केवळ भयानक अवस्थेत दिवस काढणाऱ्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी समाजातील दानशुरांनी पुढे यावे, असे आवाहन केले आहे.
जीवनाश्यक वस्तू चादरी, ताडपत्री, जुन्या सायकली यासह जे काय पुरवता येईल, ते उपलब्ध करून देण्याचा निर्धार फेसबुक फ्रेंड्स सर्कलने केला आहे. ऑक्सिजन सिलेंडर (वेगवेगळ्या पाच भागात, गर्लगुंजी, हलगा, हलशी, जांबोटी व खानापूर) देण्यात आले. खानापूर व नंदगड येथे औषध व मास्क चे वितरण, कुटीन्हो नगर या भागातील जंगल भागात राहणाऱ्या भटक्या आदिवासी जमातींना जीवनावश्यक वस्तू, भांडी,ताडपत्री, 8 सायकली, मुलांसाठी शालेपयोगी वस्तू, बूट चप्पल व पुढील काळात त्यांना स्थायिक करण्यासाठी प्रयत्न.
Facebook friends Circle : Project of Hasanwadi Adivasi Village which comes in Khanapur Taluka SAM'S Enterprises from Somwar Peth Tilakwadi - 3 Brand new Hero Bicycles. We wholeheartedly thank Smt. Alka Kawalekar and her son Mr. Mahesh Hawaldar & daughter Snehal Hawaldar and all members of their family.
Mr Amit Agarwal has donated 1 Bicycle
Mr Amit Kolekar has given 1 Bicycle
Master Advaith Sathaye 1 Bicycle
Mr Bharatesh A Lengade has given 1 Bicycle. Mr Mayur Khadd has given 1 Bicycle. Mr Sheetal Kumar has given face masks for all villagers. Care For You Ngo has given us brand new Crayons, Sketchpens, Tiffin boxes. Mr Praveen Aganoji from Khanapur has given 25 school bags. ARCHITECT Mr Rajendra Chougle from Mannur has given 20 Blankets.
Mr Jitendra Lohar has given 45 Slates and Chalk
Mr Khetaram Prajapat has donated 1 Jambo box of Parle-G Biscuits. Bajirao Appa Foundation - Mrs Sulakshana Sutar and Mr Basavaraj Sutar(Basuji Sutar) Collected some useful materials like Clothes, Toys from their friends
Mrs Manisha Mangale. Mr Nikil Johal & Mrs Roopa Punnanayar.
We thank our team members : Mr Santosh R Darekar Head of Facebook Friends Circle, Dr Sameer Shaikh, MrDhananjay Patil, Mr Prashant Birje - Principal of Cantonment Primary Marathi School, Mr Amit Parmekar. Sarfaraz Khatib, Prakash Badakannavar - Make them smile foundation were present.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : कार्य 'Facebook Friend Circle'चे - दुर्गम आणि जंगल भागात राहणार्या कुटुंबांना मदत
एकदा Photos पहाच - तुम्हाला सामाजिक कार्याची जाणीव होईल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm