बेळगावमध्ये 'गडरक्षक' चित्रपटाच्या शुटींगचा शुभारंभ; किल्ले राजहंसगडावर चित्रीकरण

बेळगावमध्ये 'गडरक्षक' चित्रपटाच्या शुटींगचा शुभारंभ;
किल्ले राजहंसगडावर चित्रीकरण

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगावमध्ये गडरक्षक चित्रपटाची निर्मिती होत असून किल्ले राजहंसगड (येळ्ळूर) येथे चित्रपटाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. गडरक्षक हा लघु चित्रपट आहे. श्रीराम सेना हिंदूस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्या हस्ते पूजन करून चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात आला. बेळगाव मधील स्थानिक कलाकारांना घेऊन या लघुचित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. गडाचे महत्त्व काय आहे व छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या युवा पिढीला समजावा या उद्देशाने लघु चित्रपट निर्मिती करण्यात येत आहे. युवा पिढी व्यसनाच्या आधीन होत असल्याने या लघु चित्रपटातून व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम दाखवण्यात येणार आहेत.
या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक संतोष सुतार आहेत. कथा, पटकथा यांची बाजूही संतोष सुतार यांनी सांभाळली आहे. यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, 'आज मला आनंद होतो की बेळगावमध्ये युवा पिढीला प्रेरणा देणार्या लघुचित्रपटाची निर्मिती होत आहे. अशा चित्रपटामुळे आपली हिंदू संस्कृती टिकेल व युवा पिढी व्यसनापासून दूर राहील'. यावेळी रमाकांत कोंडुसकर यांनी संतोष सुतार यांना शुभेच्छा दिल्या.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावमध्ये 'गडरक्षक' चित्रपटाच्या शुटींगचा शुभारंभ; किल्ले राजहंसगडावर चित्रीकरण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm