बेळगावमध्ये होणार फ्लाईंग स्कूल

बेळगावमध्ये होणार फ्लाईंग स्कूल

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : देशातील निवडक विमानतळांवर फ्लाईंग स्कूल सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मांडला आहे. बेळगाव, गुलबर्गासह इतर 6 विमानतळांवर हे फ्लाईंग स्कूल सुरू करण्यात येणार आहे. देशांतर्गत विमान प्रवास मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने पायलटची गरज भासत आहे. ही गरज या फ्लाईंग स्कूलमुळे भागविता येणार आहे. यामुळे बेळगावच्या सांबरा विमानतळाला अधिक महत्व मिळणार आहे. नुकतीच नवी दिल्ली येथे विमानतळ ऍथॉरीटीचे (Airports Authority of India - AAI) चेअरमन अरविंद सिंग यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी ही माहिती दिली आहे.
सरकारने बेळगाव, जळगाव, खजुराहो, गुलबर्गा, लिलाबरी व सालेम या विमानतळांवर फ्लाईंग स्कूल सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पुढील 5 वर्षात 9,488 पायलटची गरज भासणार आहे. त्यामुळे त्या प्रमाणात पायलट तयार करणे गरजेचे ठरणार आहे. नागरि उड्डाण विभागातर्फे प्रत्येक वर्षी 700 ते 800 व्यावसायिक पायलट लायसन्स देण्यात येते. यापैकी 30 टक्के पायलट हे परदेशात प्रशिक्षणासाठी जातात. यामुळे पायलट स्कूलची भविष्यात गरज भासणार आहे. यातील एक पायलट स्कूल हे बेळगावमध्ये होणार असल्यामुळे बेळगावच्या विमानतळाचा विकास होणार आहे.
प्रशिक्षण भारतातील प्रशिक्षित वैमानिकांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात. यासह नोकरीच्या संधीही उपलब्ध होतील. सरकारकडूनही वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्यांना इन्सेंटिव्ह दिला जाऊ शकतो. फ्लाईंग स्कूल ऑपरेटर्सकडून स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे वैमानिक निवड केली जाते. ज्यात परदेशातील वैमानिकही भाग घेऊ शकतात. त्यामुळे भारतातच ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहेत. 2018 मध्ये तत्कालिन केंद्रीय नागरि उड्डाणमंत्री जयंत सिन्हा यांनी आपल्या बेळगाव भेटी वेळी बेळगावला फ्लाईंग स्कूल सुरू करण्यासाठीचे आश्वासन दिले होते. आता या प्रस्तावाला अंतिम स्वरूप मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात बेळगावमध्ये एक सुसज्ज असे फ्लाईंग स्कूल सुरू करण्यात येणार आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावमध्ये होणार फ्लाईंग स्कूल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm