बेळगाव : जवानाच्या आईवर कोविड-19 नियमावलीनुसार अंत्यसंस्कार - श्रीराम सेना हिंदुस्थान

बेळगाव : जवानाच्या आईवर कोविड-19 नियमावलीनुसार अंत्यसंस्कार - श्रीराम सेना हिंदुस्थान

belgavkar.com | belgaum | belgavkar

जवान देशाच्या सीमेवर असताना कोरोनामुळे निधन आलेल्या आईच्या सेवेत रामसैनिक

बेळगाव : भारतीय सैन्य दलातील जवानाच्या आईवरती श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कार केले. सीमेवरती आपल्या भारत मातेचे रक्षण करणाऱ्या हत्तरगी येथील जवानाच्या आईचे आज मिलीट्री हाॅस्पिटल (Military Hospital) मध्ये कोरोना व्हायरस या आजाराने दुःखद निधन झाले. ही माहिती श्री राम सेना हिंदूस्थानचे अध्यक्ष श्री रमाकांत कोंडुस्कर यांना समजताच ते आपल्या कार्यकर्त्यांना घेवून हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. व त्या मातेवरती सदाशिवनगर स्मशानभूमीत कोविड-19 नियमावलीनूसार अंतसंस्कार केले. यावेळी श्री रमाकांत कोंडुस्कर, शंकर पाटील, महेश जाधव, नरू निलजकर, बाबू नावगेकर हे कोरोना योद्धे कार्यरत होते.

कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकही धजावत नसल्याचे गंभीर चित्र आहे. अशावेळी हिंदुत्वाच्या कार्याला वाहून घेतलेली आणि कमी तेथे आम्ही या न्यायाने सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी श्रीराम सेना हिंदुस्थान ही संघटना मानवतेच्यादृष्टीने पुढे सरसावली आहे. मागील महिनाभरापासून श्रीरामसेना हिंदुस्थान संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत 30 ते 40 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
संघटनेचे संस्थापक - अध्यश्र रमाकांत कोंडूसकर यांच्या नेतृत्वाखाली शंकर पाटील, श्रीकांत कुऱ्याळकर, बाबू नावगेकर, राजेंद्र बैलूर, सचिन पाटील, महेश जाधव आदींसह अनेक कार्यकर्ते या कार्यात आघाडीवर आहेत. या सुविधेसाठी नागरिकांनी रमाकांत कोंडूसकर (96638 31333) यांच्याशी संपर्क साधावा.


मानवतेच्या दृष्टिकोनातून संघटनेच्या माध्यमातून कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी हा लढा सुरू केला आहे. ही सुविधा मोफत आहे. कोरोना महामारीचा सामना करण्याच्या या लढ्यात संघटनेला सहभागी होता येत आहे याचा आनंद आहे - रमाकांत कोंडूसकर संस्थापक - अध्यक्ष, श्रीराम सेना हिंदुस्थान

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : जवानाच्या आईवर कोविड-19 नियमावलीनुसार अंत्यसंस्कार - श्रीराम सेना हिंदुस्थान
जवान देशाच्या सीमेवर असताना कोरोनामुळे निधन आलेल्या आईच्या सेवेत रामसैनिक

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm