बेळगाव : सांबरा विमानतळावर नवी अत्याधुनिक एक्स रे इन्स्पेक्शन सिस्टीम

बेळगाव : सांबरा विमानतळावर नवी अत्याधुनिक एक्स रे इन्स्पेक्शन सिस्टीम

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : सांबरा विमानतळावर बसविण्यात आलेली नवी अत्याधुनिक एक्स रे बॅगेज इन्स्पेक्शन सिस्टीम (एक्सबीआयएस) कार्यान्वित करण्यात आली आहे सांबरा विमानतळाची सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ही एक्सबीआयएस सिस्टीम बसविण्यात आली आहे. ही सिस्टीम CX100100D सिरीजमधील असून या सिस्टीमद्वारे अत्यंत बारकाईने प्रवाशांच्या साहित्याची तपासणी करता येणार आहे. दोन जनरेटर्स असलेल्या या एक्सबीआयएस सिस्टिमद्वारे विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवासी साहित्याची वरील व समोरील बाजू एकाच वेळी पाहता येणार आहे. परिणामी प्रवासी साहित्य तपासण्याचे काम देखील जलद गतीने होणार आहे.
विमान प्रवाशाची तपासणी यंत्राने करण्याची सोय जगात उपलब्ध आहे. क्ष-किरणे अर्थात एक्स-रे वर आधारित यंत्रे यासाठी जगभरातील अनेक विमानतळांवर वापरली जातात. आता काही नियमांच्या अधीन राहून हे यंत्र विमानतळावर बसविण्यास परवानगी मिळाली आहे. विशिष्ट वस्तूंचा शोध घेत असताना मशीन आवाज आणि प्रकाश सिग्नलने अलार्म करेल. विमान प्रवास करीत असताना सामानाची कसून तपासणी कशासाठी केली जाते याची आपल्याला माहिती आहेच. गेल्या काही वर्षांमध्ये, इतर प्रवाश्यांच्या आयुष्याला धोका उत्पन्न होईल अशा प्रकारच्या वस्तू, किंवा इतर बेकायदेशीर वस्तू विमानापर्यंत जाऊन पोहोचू नयेत यासाठी यासाठी सुरक्षा तपासणी जास्त कडक केली गेली आहे. तरीसुद्धा आपल्या सामानामधून सोने, हिरे, अंमली पदार्थ, प्राचीन, दुर्मिळ मूर्ती असल्या वस्तू नेण्याच्या प्रयत्नांत पकडल्या गेलेल्या प्रवाशांचे अनेक किस्से आपण ऐकत असतो. या वस्तूंच्या व्यतिरिक्त देखील अनेक चित्रविचित्र वस्तू प्रवासी आपल्या सामानातून नेत असताना पकडले गेले आहेत. सामान्यपणे प्रत्येक मोठ्या विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी सर्वसाधारणपणे चोवीस तासांच्या अवधीमध्ये काही हजार प्रवाश्यांची तपासणी दररोज करीत असतात.
विमान प्रवास जसजसा अधिक लोकप्रिय होत आहे, तसतशी ही संख्या वाढत जाणार आहे. त्यामुळे अनेक वस्तू बेकायदेशीरपणे सामानातून नेण्याच्या प्रयत्नांमध्ये वाढ होणार असल्याची वाढती चिंता या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आहे.
The NUCTECH™ CX100100D X-ray Inspection System is a new generation dual view dual-energy X-ray inspection machine for inspecting large luggage, baggage and small cargo. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : सांबरा विमानतळावर नवी अत्याधुनिक एक्स रे इन्स्पेक्शन सिस्टीम

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm