बेळगाव—belgavkar—belgaum : काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर विजयी झाल्यास जैतनमाळ परिसर दत्तक घेऊन सर्वांगीण विकास केला जाईल, असे आश्वासन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले. बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जैतनमाळ येथे रविवारी मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
जैतनमाळ येथील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी आपली आहे. मृणाल हेब्बाळकर निवडून आल्यास अवघ्या चार महिन्यांतया भागाचा विकास होईल. यासाठी मृणाल यांना साथ देण्याचे आवाहन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
यानंतर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जुने बेळगावात प्रचार पदयात्रा काढली. यावेळी महिलांनी आरती करून मंत्र्यांचे स्वागत केले. जुने बेळगाव नाका ते येथील श्री कलमेश्वर मंदिरापर्यंत शेकडो महिलांनी मंत्र्यांसोबत प्रचार पदयात्रेत सहभाग घेतला. तर उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासह मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी वडगाव येथील चावडी गल्लीत प्रचारसभा घेतली. यावेळी भाज कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ***———*** ***————*** ***—————*** belgav belagavi belgavkar explore digital india