बेळगाव : मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ रॅली

बेळगाव : मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ रॅली

belgavkar.com | belgaum | belgavkar

Lok Sabha Election 2024;
काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर

महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे सुपुत्र

बेळगाव—belgavkar : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ रामदुर्ग येथील विविध भागात कार्यकर्त्यांच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीला मृणाल हेब्बाळकर यांनी चालना दिली. रामदुर्ग येथील संगोळी रायण्णा चौकापासून सुरू झालेली रॅली सरकारी इस्पितळ, जुने पेठ, गांधीनगर, तहसीलदार कार्यालय, नेकारपेठ आदी भागात सुमारे तीन किलोमीटरपर्यंत काढण्यात आली.
यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी यात भाग घेतला होता. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी, भाजपमध्ये नेत्यांची कमतरता असल्याने जगदीश शेट्टर यांना बेळगावातून उभे करण्यात आल्याचे सांगितले. माजी उपमुख्यमंत्री आणि अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी भाजपवर टीका केली. भाजप हा केवळ खोटी आश्वासने देत असून अनेक आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. भाजप कार्यकाळात केवळ महागाई आहे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण व उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनीही विचार मांडले.

Belgaum Loksabha Mrinal Hebbalkar Ramdurg Rally belgavkar बेळगाव belgaum

Belgaum Loksabha Mrinal Hebbalkar Ramdurg Rally

Loksabha Mrinal Hebbalkar Ramdurg Rally belgavkar

Loksabha Mrinal Hebbalkar Ramdurg Rally belgaum

बेळगाव : मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ रॅली
Lok Sabha Election 2024; काँग्रेसचे उमेदवार मृणाल हेब्बाळकर

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm