5 वेळा खासदार राहिलेला दिग्गज नेता भाजपात

5 वेळा खासदार राहिलेला दिग्गज नेता भाजपात

belgavkar.com | belgaum | belgavkar

Congress Rajya Sabha MP Naran Rathwa joins BJP

काँग्रेसचे विद्यमान राज्यसभा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री

LokSabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे विद्यमान राज्यसभा खासदार आणि यूपीए सरकारमधील माजी रेल्वे राज्यमंत्री नारायण राठवा (Narayan Rathwa joins BJP) यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यांनी आज (27 फेब्रुवारी) मुलगा संग्राम सिंहसह भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला (Gujarat Congress leaders Naran Rathwa, son Sangramsinh join BJP).
गुजरात भाजपचे प्रमुख सीआर पाटील (CR Patil) यांनी राठवा आणि इतरांना पक्षाच्या राज्य मुख्यालय आयोजित कार्यक्रमात पक्षात सामील करुन घेतले. नारायण राठवा अशा काँग्रेस नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ यावर्षी पूर्ण होत आहे. 2004 मध्ये छोटा उदेपूर लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले. या मतदारसंघातून ते पाच वेळा खासदार झाले आहेत. 1989 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ही जागा जिंकली होती. मात्र, 2009 आणि 2014 मध्ये त्यांना दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले.
गुजरातमधील छोटा उदेपूर येथील आदिवासी नेता राठवा यांचा राज्यसभा सदस्य म्हणून कार्यकाळ या वर्षी एप्रिलमध्ये संपणार आहे. राठवा यांचा मुलगा संग्रामसिंह याने 2022 ची गुजरात विधानसभा निवडणूक अनुसूचित जमाती (एसटी) - आरक्षित छोटा उदेपूर जागेवरुन काँग्रेस उमेदवार म्हणून लढवली होती, परंतु तो अयशस्वी ठरला. राठवा 2004 मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री होते. 

Congress Rajya Sabha MP Naran Rathwa joins BJP



Narayan Rathwa joins BJP

5 वेळा खासदार राहिलेला दिग्गज नेता भाजपात
Congress Rajya Sabha MP Naran Rathwa joins BJP

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm