लोकसभेसाठी राहुल गांधींचा केरळला 'बाय-बाय'?

लोकसभेसाठी राहुल गांधींचा केरळला 'बाय-बाय'?

belgavkar.com | belgaum | belgavkar

Will Rahul Gandhi contest Lok Sabha polls from Wayanad?
वायनाड नव्हे, 'या' ठिकाणाहून लढण्याची चर्चा

CPI fields Annie Raja from Wayanad, Rahul Gandhi's Lok Sabha seat

Lok Sabha Elections 2024 :  लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यावेळी केरळला बाय-बाय करू शकतात. केरळमध्ये एलडीएफने राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघातून तसेच शशी थरूर यांच्या तिरुवनंतपुरम मतदारसंघातून उमेदवारांची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यावेळी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवणार नसल्याचे मानले जात आहे. यापूर्वीही राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढणार नसल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे आता राहुल कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार यावर विविध चर्चा होताना दिसत आहेत. त्यात दोन नावे पुढे येत आहेत.
राहुल गांधी तेलंगणासह यूपीच्या रायबरेली किंवा अमेठीतून निवडणूक लढवू शकतात, असे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मात्र, काँग्रेसकडून याबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. अमेठीत स्मृती इराणी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनीही काहीही बोललेले नाहीत. इंडिया आघाडीचा भाग असलेल्या सीपीआय (एम) ने केरळमधील 4 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे या चौघांमध्ये राहुल गांधींच्या वायनाड आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या तिरुअनंतपुरमच्या जागेचाही समावेश आहे.
सीपीआयने वायनाड मतदारसंघातून पक्षाचे सरचिटणीस डी राजा यांच्या पत्नी सीपीआय नेत्या ॲनी राजा यांना उमेदवारी दिली आहे. केरळमधील जागावाटपाबाबत इंडिया आघाडीचा अद्याप कोणताही समझोता झालेला नाही. या दरम्यान, एका घटकाने उमेदवार जाहीर केल्याने इंडिया आघाडीतही फूट पडल्याच्या चर्चा आहेत. तसेच, ही काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी डाव्या पक्षांनी केलेली रणनीती असल्याचे राजकीय जाणकार सांगताना दिसत आहेत. इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या दबावामुळे गांधी वायनाड मतदारसंघ सोडण्याचा विचार करत असल्याचे वृत्त न्यूज 18 ने दिले होते. आता राहुल गांधी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

Will Rahul Gandhi contest Lok Sabha polls from Wayanad

CPI fields Annie Raja from Wayanad

लोकसभेसाठी राहुल गांधींचा केरळला 'बाय-बाय'?
Will Rahul Gandhi contest Lok Sabha polls from Wayanad? वायनाड नव्हे, 'या' ठिकाणाहून लढण्याची चर्चा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm