'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार'

'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार'

belgavkar.com | belgaum | belgavkar

शरद पवार गटाला मिळालेले नाव कायम राहणार

Supreme Court Allows Sharad Pawar Faction To Use 'Nationalist Congress Party - Sharad Chandra Pawar' Name Till Further Orders महाराष्ट्र : पुढील आदेशापर्यंत 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' हे पक्षाचं नाव कायम ठेवण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिलाय. येत्या आठवडाभरात शरद पवार गटाला नवं निवडणूक चिन्ह द्यावं, असे आदेशही सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिलंय. आयोगाच्या या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज कोर्टात सुनावणी झाली.
त्यावेळी आगामी निवडणुकीपर्यंत पक्षाचं नवं नाव कायम ठेवावं, अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केली. ही विनंती कोर्टानं मान्य केली. भाजपात जाणार नाही असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलंय. आपण गेल्या कित्येक महिन्यात दिल्लीला गेलेलो नाही. त्यामुळं कुणाची भेट होण्याचा प्रश्नच नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागल्याचं बोललं जातंय. त्यावर जयंत पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिलंय.

Supreme Court Allows Sharad Pawar Faction

Nationalist Congress Party Sharad Chandra Pawar

'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार'
शरद पवार गटाला मिळालेले नाव कायम राहणार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm