लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू उतरला

लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू उतरला

belgavkar.com | belgaum | belgavkar

टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुबमन गिल

लोकसभा निवडणूकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. या तारखा जाहीर होण्याआधी देशात सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणूकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब की बार 400  पारचा नारा दिला आहे. तर भाजपला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी विरोधक एकत्र आलेत. मात्र जागावाटप होईपर्यंत काही सांगता येत नाही. ‘इंडिया’मध्ये आधीच फुट पडलेली पाहायला मिळत आहे. अनेक पक्षांनी स्वबळावर  लढणार असल्याचं सांगितलं आहे. सर्व पक्ष राजकीय आखाड्यात उतरण्याआधी ताकद लावत आहत. अशातच टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुबमन गिलवर (Cricketer Shubman Gill) लोकसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे (Cricketer Shubman Gill designated as Punjab 'state icon' for Lok Sabha polls : CEO).
टीम इंडियाचा खेळाडू शुबमन गिल याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) कार्यालयाने भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिलला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘स्टेट आयकॉन’ बनवलं आहे. शुबमन गिल याला स्टेट ऑयकॉन देण्यामागे मतदारांमध्ये जनजागृती करणे हा त्यांचा उद्देश असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी सिबिन यांनी सांगितलं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 13 जागांसाठी 65.96 टक्के मतदान झाले होते. आता राज्यातील मतदानाची टक्केवारी 70 टक्क्यांच्या पुढे नेण्याचं टार्गेट असल्याचंही सिबिन म्हणाले (Star batter Shubman Gill to be Punjab's state icon for Lok Sabha elections).
दरम्यान, लोकप्रिय पंजाबी गायक तरसेम जस्सर याची याआधी स्टेट आयकॉन म्हणून निवड केली गेली होती. शुक्रवारी पंजाबच्या सर्व उपायुक्तांसोबत झालेल्या बैठकीत त्यांना गेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी असलेले भाागांची माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले होते. शुबमन गिल गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा मुख्य ओपनर म्हणून टीममध्ये खेळत आहे. आता झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्येही त्याचा समावेश होता. आगामी आयपीएलमध्ये गिल हा गुजरात संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी पार पडणार आहे.

Cricketer Shubman Gill state icon for Lok Sabha elections

Shubman Gill to be Punjab state icon Loksabha

लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात टीम इंडियाचा हा स्टार खेळाडू उतरला
टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुबमन गिल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm