वर्ल्ड कप 2024 चे वेळापत्रक जाहीर;

वर्ल्ड कप 2024 चे वेळापत्रक जाहीर;

belgavkar.com | belgaum | belgavkar

भारतीय संघाला अ गटात स्थान

ICC U19 Men’s Cricket World Cup

दक्षिण आफ्रिकेत पुढल्या वर्षी होणाऱ्या 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. पाच वेळच्या विजेत्या भारताचा पहिला सामना 2020च्या विजेत्या बांगलादेशविरुद्ध ब्लोएमफोंटेन येथे होणार आहे, तर यजमान दक्षिण आफ्रिका सलामीच्या लढतीत वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे.  16 संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील 41 सामने 5 वेगवेगळ्या मैदानांवर खेळवण्यात येणार आहे.
  भारतीय संघाला अ गटात बांगलादेश, आयर्लंड व अमेरिका यांचा सामना करायचा आहे. ब गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व स्कॉटलंड; क गटात ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे व नामिबाया, तर ड गटात अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड व नेपाळ यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल 3 संघ सुपर सिक्स मध्ये खेळतील, त्यानंतर उपांत्य फेरी व फायनल होईल.   
1998 व 2020 नंतर दक्षिण आफ्रिकेत तिसऱ्यांदा 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सर्व संघ 13 ते 17 जानेवारी या कालावधीत प्रत्येकी दोन सराव सामने खेळतील.  

भारताचे सामने  : 20 जानेवारी - वि. बांगलादेश
25 जानेवारी - वि. आयर्लंड
28 जानेवारी - वि. अमेरिका  

ICC U19 Men’s Cricket World Cup Schedule

ICC U19 Mens Cricket World Cup 2024

ICC Cricket Mens Under 19 World Cup

ICC U19 Men’s Cricket World Cup Schedule

वर्ल्ड कप 2024 चे वेळापत्रक जाहीर;
भारतीय संघाला अ गटात स्थान

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm