इतिहासाच्या पोटातलं आणखी एक सोनेरी पान;

इतिहासाच्या पोटातलं आणखी एक सोनेरी पान;

belgavkar.com | belgaum | belgavkar

'महाराजा यशवंतराव होळकर' यांची शौर्यगाथा

भारताच्या वैभवशाली पराक्रमी इतिहासातील सुवर्ण अक्षरात लिहून ठेवलेलं एक ओजस्वी तेजस्वी पान म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धातील एक महापराक्रमी व लोककल्याणकारी महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संस्कारात वाढलेले व कमी वयातच आपले वडील म्हणजे तुकोजीराव होळकर यांच्यासोबत मोहिमेवर जाणारे तेजस्वी पुत्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 29 वर्षाच्या आदर्श राज्यकारभारानंतर आणि तुकोजी होळकर यांच्या पश्चात स्वकर्तुत्वाने आपले गेलेले वैभव आपल्या हिम्मतीवर बुद्धिमत्तेवर आणि पराक्रमावर परत मिळविणारे योद्धे म्हणजे महाराजा यशवंतराव यांची कहाणी आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दौलतराव शिंदे आणि दुसरा बाजीराव यांनी कटकारस्थान करून पुण्यात होळकरांच्या राजपुत्राला पकडल्यावर पुढे काय झाले हे पाहताना थरार आल्याशिवाय राहणार नाही. या सिनेमांमध्ये कलेतील नऊ रस पाहायला मिळणार आहेत. महाराजा यशवंतराव होळकरांनी पुण्यावर हल्ला का चढविला, पुण्यातील हडपसर, कोंडवा, मुंडवा ही नावे कशी निर्माण झाली. पेशवे, शिंदे विरुद्ध यशवंतराव होळकर यांच्या लढाईमध्ये कोणाचा विजय झाला आणि शनिवारवाड्याच्या गादीवर कोण बसले, दुसऱ्या बाजीरावाने वसई येथे जाऊन इंग्रजांसोबत कोणता तह केला व तो का केला, यशवंतराव होळकरांनी कोणाला आपले प्रमुख शत्रू मानले होते, यशवंतराव होळकर यांनी आपल्या आयुष्यामध्ये इंग्रजांसोबत किती व कोठे लढाया केल्या, त्या लढाया किती भयंकर व उग्र होत्या हेही आपणाला या चित्रपटाच्या माध्यमातून पहावयास मिळणार आहेत.
जगाच्या पाठीवर जगाच्या इतिहासात एकदा उडवलेली तोफ निकामी करण्याचे तंत्र यशवंतराव होळकरांनी कसं अवलंबलं हे फक्त तुम्हाला या सिनेमांमध्ये पहावयास मिळणार आहे. अशा महान पराक्रमी योद्धयाचा इतिहास भारतातील लोकांच्या समोर येणे गरजेचे आहे म्हणून 'अलख क्रिएटिव्ह इंटरटेनमेंट' या चित्रपट निर्मिती संस्थेचे सर्वेसर्वा श्री नवनाथजी पडळकर साहेब यांनी 'महाराजा यशवंतराव होळकर' हा भव्य दिव्य चित्रपट निर्मिती करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन सुरज रणदिवे करणार आहेत. हा सिनेमा मराठी सिनेमा सृष्टीतील नामांकित कलाकारांसोबत तसेच नवख्या कलाकारांना देखील या सिनेमात काम करण्याची संधी मिळणार आहे. सिनेमात मोठ्या प्रमाणात आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार असून हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येईल असे निर्माता नवनाथ पडळकर यांनी सांगितले.

Marathi Historic Movie On Maharaja Yashvant Holkar

Marathi Historic Movie Yashvant Holkar

Marathi Historic Movie

इतिहासाच्या पोटातलं आणखी एक सोनेरी पान;
'महाराजा यशवंतराव होळकर' यांची शौर्यगाथा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm