रजनीकांत ठरले आशियातील सर्वात महागडे अभिनेते

रजनीकांत ठरले आशियातील सर्वात महागडे अभिनेते

belgavkar.com | belgaum | belgavkar

आगामी सिनेमासाठीचं मानधन वाचून चकीत व्हाल

जेलर सिनेमाच्या तुफान यशानंतर कलानिधि मारन यांनी रजनीकांत यांना 100 कोटींचा चेक दिला आहे. हा चेक जेलर सिनेमाच्या प्रॉफिट शेअरिंगचा असल्याची माहिती आहे. या प्रॉफिट शेअरिंगशिवाय रजनीकांत यांना सिनेमासाठी 110 कोटी मानधन मिळाल्याचंही बोललं जातं. त्यामुळे एकूण मिळून रजनीकांत यांना एकाच सिनेमासाठी 210 कोटी रुपये मिळाल्याची चर्चा आहे. त्यानुसार, रजनीकांत आता देशातील सर्वात महागडे अभिनेते ठरले आहेत.
रजनीकांत आगामी लोकेश कनगराज यांच्या थलाइवर 171 सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमातील त्यांचं मानधन मोठं असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमासाठी सुपरस्टार रजनीकांत 260 ते 280 कोटी चार्ज करत असल्याची चर्चा आहे. ही चर्चा खरी ठरल्यास रजनीकांत आशियातील सर्वाधिक फी घेणारे अभिनेते ठरतील.
72 वर्षीय रजनीकांत यांचे काला, दरबार, पेट्टा 2.0 हे सिनेमे तुफान गाजले. यावर्षी आलेल्या जेलर सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. जेलर सिनेमाच्या यशानंतर आता रजनीकांत यांनी त्यांच्या फीमध्ये मोठी वाढ केल्याचं बोललं जात आहे. थलाइवर 171 या आगामी सिनेमासाठी रजनीकांत यांनी 260 ते 280 कोटी रुपयांचं मानधन घेतल्यास ते हायेस्ट पेड अभिनेते ठरतील. रजनीकांत याआधीही त्यांच्या मानधनामुळे आशियाई लिस्टमध्ये टॉपला होते. त्यांनी जॅकी चैन यांना मागे टाकलं होतं.

Popular hero cum hardcore Superstar Rajinikanth fan to play his villain in Thalaivar 171?

Lokesh Kanagaraj on Thalaivar 171 : I am going to explore Rajinikanth’s side

Rajinikanth Salary For Thalaivar 171 Movie Lokesh Kanagaraj

Rajinikanth Thalaivar 171 Movie

रजनीकांत ठरले आशियातील सर्वात महागडे अभिनेते
आगामी सिनेमासाठीचं मानधन वाचून चकीत व्हाल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm