बेळगाव शहरात विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात अखेर कारवाई सुरु
गोलाकार केलेले पालिकेचे कर्मचारी व अधिकारी दंड वसूल करताना

बेळगाव शहरात विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात अखेर कारवाई सुरु

belgavkar.com | belgaum | belgavkar

पान, तंबाखू किंवा गुटखा खावून रस्त्यावर थुकणाऱ्यांवरही कारवाई...

बेळगाव शहरात विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात अखेर महानगरपालिकेने कारवाई सुरु केली आहे. आयुक्त के. एच. जगदीश यांनी गुरुवारी (24 सप्टेंबर) पर्यावरण विभागाचे अभियंते महांतेश नरसण्णावर, महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर व महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर यांना बोलावून कारवाई सुरु करण्याची सूचना दिली. त्यानुसार गुरुवारी आरोग्य निरीक्षक, मुकादम, महसूल निरीक्षक, वॉर्ड क्लर्क यांनी कारवाईला सुरवात केली. मास्क न वापरणाऱ्यांना थांबवून त्यांच्याकडून 100 रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. महापालिकेने विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरु केली आहे.
शुक्रवारी मनपाने तीन पथकांद्वारे तब्बल 986 जणांवर दंडात्मक कारवाई करत 97,750 रुपये दंड वसूल केला. आरोग्य निरीक्षक व मुकादमांच्या पथकाने 453 जणांवर कारवाई करत 44,600 रु. दंड वसूल केला. महसूल पथकाने 268 जणांवर कारवाई करत 26,850 रुपये, तर विभाग अधिकाऱ्यांच्या पथकाने 265 जणांवर कारवाई करुन 26,300 रु. दंड वसूल केला आहे. 1 मे ते 25 सप्टेबरपर्यंत महापालिकेने 3,647 जणांवर दंडात्मक कारवाई करुन 3 लाख 63 हजार 790 रुपये दंड वसूल केला आहे.
बेळगावात पान, तंबाखू किंवा गुटखा खावून रस्त्यावर थुकणाऱ्यांवरही कारवाई सुरू
करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त के. एच. जगदीश यांनी घेतला आहे. त्याबाबतचा आदेश त्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना बजाविला आहे. आता रस्त्यावर थुकणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाणार आहे. आजवर विनामास्क दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई केली जात होती, पण खरेदीसाठी विनामास्क बाजारपेठेत आलेले नागरिक, विनामास्क थांबलेले विक्रेते, मास्क न घालताच चारचाकी वाहनातून प्रवास करणारे या सर्वांवरच कारवाई होणार असल्याचे आयुक्त जगदीश यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. मुळात एप्रिल महिन्यात राज्य शासनाने मास्कसंदर्भात बजाविलेल्या आदेशात, विनामास्क फिरणारे, प्रवास करणारे या सर्वांवरच कारवाई होणार असल्याचे आयुक्त जगदीश यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. राज्य शासनाने मास्कसंदर्भात बजाविलेल्या आदेशात, विनामास्क फिरणारे, शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन न करणारे तसेच रस्त्यावर थुकणारे या सर्वांवरच कारवाई करण्याची तरतूद आहे. प्रत्येकी 100 रुपये दंड आकारण्याचे आदेशात नमूद आहे.
मात्र महापालिकेने केवळ विनामास्क फिरणाऱ्यांविरोधातच कारवाई केली. तेही केवळ दुचाकीवरून फिरणाऱ्यांनाच कारवाईच्या कक्षात आणले. प्रभागनिहाय कोरोना दक्षता समितीची स्थापना झाल्यावर केवळ एकच दिवस शारीरिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन केलेल्यांवर कारवाई करण्यात आली. या नव्या आदेशामुळे गुटखा व तंबाखूचे सेवन करणाऱ्यांची चांगलीच गोची होणार आहे. गुरुवारपासूनच महापालिकेच्या आरोग्य व महसूल विभागाचे कर्मचारी कारवाईसाठी सज्ज झाले आहेत. मास्क न वापरणाऱ्यांना थांबवून त्यांच्याकडून शंभर रुपये दंड वसूल केला जात आहे. शहरातील महत्त्वाच्या वर्दळीच्या ठिकाणी महापालिकेची पथके, विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात कारवाई करताना दिसत आहेत. कारवाई चुकविणाऱ्या दुचाकी चालकांचा नंबर टिपून, त्यांचा पत्ता शोध घेऊन घरी दंडाची नोटीस पाठविण्यात येत असल्याची माहिती मनपा आयुक्त हे जगदीश यांनी दिली आहे.
बेळगाव शहरात एकाच दिवशी 96,750 रुपये दंड वसूल
आज बेळगाव शहरात आरोग्य विभाग, महसूल विभागा व सेक्शन ऑफिसर्स टीम या तिन्ही टीमने मास्क न घालता फिरताना फिरणार्यांकडून 97,750 रुपये दंड वसूल केला.
आरोग्य विभाग = 44,600
महसूल टीम = 26,850
सेक्शन ऑफिसर्स टीम = 26,300
1 मे 2020 पासून आजपर्यंतची रक्कम 3,63,790 रुपये

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरात विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात अखेर कारवाई सुरु
पान, तंबाखू किंवा गुटखा खावून रस्त्यावर थुकणाऱ्यांवरही कारवाई...

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm