बेळगाव : तरी सायकलफेरी काढणारच; 1 नोव्हेंबर रोजी काळ्यादिनी मूक सायकलफेरी काढली जाणार

बेळगाव : तरी सायकलफेरी काढणारच;
1 नोव्हेंबर रोजी काळ्यादिनी मूक सायकलफेरी काढली जाणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय

बेळगाव—belgavkar : बेळगावसह 856 गावे अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आली. याचा निषेध म्हणून 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्यात येतो. बुधवार दि. 1 रोजी मध्यवर्ती म. ए. समितीच्या आदेशानुसार काळा दिन गांभीर्याने पाळून मूक सायकल फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा दिला जात आहे. दि. 1 नोव्हेंबर रोजी काळ्यादिनी मूक सायकलफेरी काढली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे यासाठी परवानगी अर्ज दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून या फेरीला प्रशासनाकडून परवानगी नाकारली जात आहे असे असले तरी सायकलफेरी काढणारच, असा निर्णय तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा मंदिरात झालेल्या तालुका म. ए. समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. राजाभाऊ पाटील होते. सचिव एम. जी. पाटील, रामचंद्र मोदगेकर, आर. आय. पाटील, आर. एम. चौगुले व्यासपीठावर उपस्थित होते. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून प्रत्येक वर्षी काळ्यादिनी मूक सायकल फेरीचे नियोजन केले जाते. मध्यवर्तीच्या निर्देशानुसार खानापूर, बेळगाव, निपाणी येथील घटक समितींकडून याची कार्यवाही केली जाते. जिल्हा प्रशासनाकडून मूक सायकल फेरीला परवानगी देणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. असे असले तरी समितीकडून परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. परवानगी नाही दिली तरी काळादिन गांभीर्याने पाळला जाणार आहे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

belgaum Will take cycle rally 1st November black day mes belgavkar बेळगाव belgaum

belgaum 1st November black day mes belgaum

1st November black day mes

बेळगाव : तरी सायकलफेरी काढणारच; 1 नोव्हेंबर रोजी काळ्यादिनी मूक सायकलफेरी काढली जाणार
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm