railway-minister-suresh-angadi-belgaum-belgavkar.jpg | बेळगाव : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांचे निधन Coronavirus | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांचे निधन Coronavirus

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगावचे खासदार श्री सुरेश अंगडी यांचं Covid-19 मुळे निधन झालं. - भावपूर्ण श्रद्धांजली

सुरेश अंगडी यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 4 वाजता दिल्लीत होणार अंत्यसंस्कार

बेळगाव : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व बेळगावचे खासदार सुरेश चन्नबसप्पा अंगडी (वय 65) (Belgaum MP and State Railway Minister Suresh Angadi) यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यांच्यावर एम्स (AIMS Delhi) दिल्ली येथे उपचार सुरू झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान बुधवारी (23 सप्टेंबर) 8 च्या दरम्यान मृृत्यू झाला आहे. अंगडी यांचं Covid-19 मुळे निधन झालं. अंगडी यांच्या पच्छात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. मुळेचे केकेकोप्प (ता. बेळगाव) गावचे अंगडी गेली 16 वर्षे बेळगावचे खासदार होते.
पहिल्यांदाच भारताचे केंद्रीय मंत्री Coronavirus ला बळी पडले आहेत. अंगडी यांच्यावर गेले 2 आठवडे उपचार सुरू होते. बेळगावचे खासदार असलेले सुरेश अंगडी पहिल्यांदाच मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवत होते. 11 सप्टेंबरला सुरेश अंगडी यांनी Tweet करून आपल्याला Corona चा संसर्ग झाल्याची माहिती दिली होती. मंत्री जगदीश शेट्टर यांनी सुरेश अंगडी मृत झाल्याचे स्पष्ट केले. चौथ्यांदा खासदार असलेले सुरेश अंगडी यांनी यावेळी रेल्वे राज्यमंत्री होते. 12 दिवसांपासून त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना जास्त त्रास होत असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. त्यांना पाहिल्यादाच मंत्रीपद मिळालं होते. सुरेश आंगडी यांचा बेळगाव मतदारसंघ होता. ते सलग चारवेळा निवडून आले होते.  2004 लागू पहिल्यांदा लोकसभा लढविली. तेव्हा ते विजयी झालेत. त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 सलग चौथ्यांदा विजयी झाले. 2019 च्या सरकारमध्ये रेल्वे राज्यमंत्री पद मिळाले. त्यांनी रेल्वे डिजिटलायजेशनवर भर दिला. रेल्वेच्या स्वच्छतेवर विशेष भर दिला.
सुरेश अंगडी यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी नवी दिल्ली येथे होणार अंत्यसंस्कार
आज गुरुवारी (24 सप्टेंबर) सायंकाळी दिल्ली येथील द्वारका सेक्टर 4 येथील लिंगायत स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला, मुलगी श्रद्धा व जावई दिल्लीतच आहेत. त्यांची मोठी मुलगी डॉ. स्फूर्ती व भाऊ तसेच बेळगाव व कर्नाटकातील भाजपाचे नेते सकाळी बंगळूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत. आज सायंकाळी दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहेत. दिल्लीतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी केले जातील, अशी माहिती मिळाली आहे. सायंकाळी 4 वाजता दिल्ली लोधी रोड येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार  होणार आहेत.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह कर्नाटकातील मंत्री लोकप्रतिनिधीनी त्यांचे पार्थिव दिल्लीहून बेळगावला आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांचे व्याही माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे रात्रीच बंगळुरूहून दिल्लीला विशेष विमानाने रवाना झाले होते. त्यांनीही पार्थिव बेळगावला आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, कोविड नियमावली नुसार त्यांचे पार्थिव दिल्ली बाहेर नेण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली नव्हती. यासाठी अंतिम संस्कार दिल्लीतच होणार असल्याची  माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला दुखवटा व्यक्त
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपल्या ट्विटर संदेशामध्ये त्यांनी अंगडी यांच्या कार्याला उजाळा दिला आहे. कर्नाटक राज्यात पक्षासाठी त्यांनी केलेले कार्य भरीव स्वरूपाचे होते .त्यांच्या निधनामुळे देशाचे एक कुशल नेतृत्व हरपले आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान मोदी, मुख्यमंञी येडियुरप्पा, संरक्षणमंञी यांनी वाहिली श्रद्धांजली

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरेश अंगडी याना श्रद्धांजली वाहिली : सुरेश अंगडी आपल्यातून निघून गेले यावर माझा विश्वास बसत नाही. आपल्या कार्यावर प्रामाणिकपणे परिश्रम घेणारे सुरेश अंगडी यांच्या जाण्याने नेहमी कमी जाणवेल, एका मौल्यवान सहकाऱ्याला आपण गमावल्याचे दुःख त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली वाहिली : अंगडी हे उत्तम प्रशासक, प्रभावी व्यक्तिमत्व आणि अनुभवी खासदार होते. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारावर आलेल्या दुःखद प्रसंगात आपण सहभागी असल्याचे सांगत ट्विटरद्वारे त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली वाहिली : सुरेश अंगडी हे एक निष्ठावान कार्यकर्ते होते. कर्नाटकात पक्षाला बळकट करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. अंगडी यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे.