बेळगाव : समितीतील सभासदांची संख्या वाढवण्याचा निर्णय

बेळगाव : समितीतील सभासदांची संख्या वाढवण्याचा निर्णय

belgavkar.com | belgaum | belgavkar

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती

बेळगाव—belgavkar : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती अधिक कार्यक्षम होण्यासाठी समितीतील सभासदांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेळगाव शहर आणि तालुका तसेच निपाणी व बिदर भागातून सभासदांची नावे देण्याचे आवाहन केले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मध्यवर्ती समितीच्या सभासदांची बैठक झाली. दर बैठकीला अनेकजण गैरहजर राहत असल्याने मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे आदींनी बेळगाव शहर आणि तालुक्यातून प्रत्येकी 20 सभासदांची नावे द्यावीत तर निपाणी व बिदर भागातून प्रत्येकी 10 सभासदांची नावे द्यावीत, अशी सूचना केली.
बैठकीचे अध्यक्ष ऍड राजाभाऊ पाटील यांनी सभासदांची संख्या वाढविण्याबाबत प्रत्येक घटक समितीने निर्णय घ्यावा आणि नावे द्यावीत अशी सूचना केली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीत अनेकांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कार्यक्षम कार्यकर्त्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यवर्ती समितीत शहर आणि परिसरातील अनेकांची नावे आहेत. मात्र अनेकजण गैरहजर राहतात. नवीन सभासदांची नावे देण्याची सूचना केली आहे. मालोजी अष्टेकर, सरचिटणीस, मध्यवर्ती म. ए. समिती

belgaum Decision to increase the number of members in the mes committee belgavkar बेळगाव belgaum

belgaum mes Decision to increase the number of members in the committee belgaum

बेळगाव : समितीतील सभासदांची संख्या वाढवण्याचा निर्णय
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm