बेळगावात हेल्प फॉर निडीच्या माध्यमातून बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार Help for Needy

बेळगावात हेल्प फॉर निडीच्या माध्यमातून बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार Help for Needy

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : हेल्प फॉर निडीच्या (Help for Needy) माध्यमातून बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात येत आहेत. रेल्वे स्थानक नजिक 31 ऑगस्ट रोजी सापडलेल्या रुग्णाला सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचाराचा उपयोग न होता त्याचा 8 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. हेल्प फॉर निडीच्या माध्यमातून या बेवारस मृतदेहाचा अंतिम संस्कार शनिवारी करण्यात आला.
Help for Needy संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत बेळगाव परिसरातील गरीब गरजूंच्या मदतीसाठी कार्य केले. कोरोना व्हायरसच्या महामारीमध्ये सुरेंद्र अनगोळकर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा केली आहे. सिव्हिल हॉस्पिटल तसेच हाॅस्पिटलांना त्यांनी ऑक्सिजन पुरविणारे गॅस दिले आहेत. त्यासाठी त्यांनी कोविड सेंटरमध्ये देखील जाऊन काम केले आहे. त्यांचे कार्य हे अनेकांना लाजवणारे आहे. त्यांनी रुग्णवाहिकाही सुरु केली आहे. Help for Needy ने आजवर अनेक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.
मृतावरील अंत्यसंस्कार व कोरोनाबाधित रुग्णांसाठी हेल्प फॉर निडीचा पुढाकार
कोरानामुळे अनेक जण भीतीच्या छायेखाली वृद्धापकाळाने तसेच अन्य कारणाने मृत पावलेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराकडेही दुर्लक्ष जात आहे. हालगा - बस्तवाड येथे येथे एक 68 वर्षीय व्यक्ती मृत पावली. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याकडे येथील रहिवाशांनी दुर्लक्ष केले. अशावेळी Help for Needyच्या सदस्यांनी त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत केली आहे.
आत्महत्या रोखण्यासाठी 'Help For Needy' चा पुढाकार - 8618993767 या क्रमांकावर संपर्क करावा

बेळगाव शहर व जिल्ह्यामध्ये आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या आत्महत्या ही चिंताजनक बाब असून त्या रोखण्यासाठी 'Help For Needy' या संघटनेने विशेष असा आगळा उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत आत्महत्या रोखण्यामध्ये संघटनेचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर प्रयत्न करत आहेत. 'हेल्प फोर नीडी' ही संघटना समाजातील वंचित गरजू आणि गरीब घटकांसाठी कार्य करते. गेल्या तीन वर्षापासून सदर संघटना सिव्हिल हॉस्पिटलमधील गरजूंना विनामूल्य भोजन देत आहे. याशिवाय ज्यांचे शिक्षण अडले आहे, ज्यांच्या शस्त्रक्रिया आर्थिक परिस्थितीमुळे थांबल्या आहेत, अशा सर्वांना सदर संघटना मदत करत असते.
सध्याच्या काळात वाढलेल्या आत्महत्या लक्षात घेत सदर संघटनेने याबाबत कृतिशील पाऊल उचलले आणि या आत्महत्या रोखण्यासाठी समाजातील विविध घटकांना एकत्र आणून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचे वागणे अचानक बदलते, ती एकटी एकटी राहू इच्छिते, अचानक संवाद बंद करते किंवा अशा व्यक्तींच्या नेहमीच्या वागण्यामध्ये काही बदल आढळले तर कुटुंबीयांनी त्या व्यक्तीवर विशेष लक्ष ठेवावे आणि आपल्याला 8618993767 या क्रमांकावर त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन सुरेंद्र अनगोळकर यांनी शेवटी केले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगावात हेल्प फॉर निडीच्या माध्यमातून बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार Help for Needy

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm