बेळगाव : सावगाव येथे छञपती शिवाजी महाराजांची सिंहासनारुढ  मूर्ती;

बेळगाव : सावगाव येथे छञपती शिवाजी महाराजांची सिंहासनारुढ मूर्ती;

belgavkar.com | belgaum | belgavkar

समस्त शिवभक्तांना आवाहन - श्री शिवस्मारक सेवा समिती, सावगाव

हिंदवी स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराजांचे प्रशासन जगाला आदर्शवत आहे. त्यांचे विचार तरुणांनी आत्मसात करावेत. गावोगावी उभारणाऱ्या शिवमूर्तींपासून आजच्या तरुणाईने प्रेरणा घ्यायला हवी. सावगाव (ता. बेळगाव ) येथील लक्ष्मी चौकात श्री शिवस्मारक सेवा समिती व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने 8 फुट ऊंच (प्रभावळ धरून) पंचधातूची सिंहासनारुढ छञपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसविण्यात येणार आहे. या मूर्तीवर हिंदवी स्वराज्याचे छञही लावण्यात येणार आहे. शिवछत्रपतींच्या मूर्तीची सिंहासनारूढ प्रतिकृती सावगाव इथे पाहता येणार आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज सुवर्ण सिंहासनावरून हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार प्रसन्न मुद्रेने चालवत आहेत अशी चेहर्यावरील भावमूद्रा असलेली मूर्ती प्रतिष्ठापीत करण्यात येणार आहे. नव्या पिढीला प्रेरणा देण्याची ताकद शिवछत्रपतींचे कार्य आणि हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात आहे. त्या हेतूनेच हे शिल्प साकारले जात आहे.

या मूर्ती व स्मारकामुळे निच्छितच पच्छिम भागातील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वातावरण प्रसन्न व शिवमय बनून जाणार आहे. छञपती शिवाजी महाराजांची मूर्ती सिंहासनाधिश्वर म्हणजेच सिंहासनावर विराजमान असलेली आहे. व महाराजांच्या डोईवर पंचधातूचे छञ उभारण्यात येणार आहे.
श्री शिवस्मारक सेवा समिती, सावगाव
पश्चिम भागातील शिवभक्तांचे शिवस्मारक सावगाव येथे साकार होत आहे. तरी शिवस्मारकाचा लवकरच लोकार्पण सोहळा करायचा आहे. त्यासाठी ज्या दानशूर व्यक्तींना सढळ हस्ते मदत करायची असल्यास दिलेल्या खात्यात रक्कम जमा करावी, असे आवाहन श्री शिवस्मारक सेवा समिती, सावगाव यांच्याकडून करण्यात आले आहे.
मूर्तिकार : विक्रम जे. पाटील, अनगोळ
अर्किटेक्ट : मुतगेकर, बसवण कुडची
सावगावात 21 लाख रुपये खर्चातून उभारण्यात येणार शिवस्मारक : दसरोत्सवाच्या मुहूर्तावर झाले आहे भूमिपूजन
Account Name: SHREE SHIVSMARAK SEVA SAMITI
Bank : Syndicate Bank (Canara Bank)
Account Number : 05643070001279
IFSC Code : SYNB0000564
Branch : 564 BENAKANAHALLI
ANGADI INSTITUTE OF TECHNOLOGY
SAVGAON ROAD, BELGAUM
जमा केलेले पेयमेंट स्लिप 9742136004 या नंबरवर व्हाट्सअप्प करावी.
अध्यक्ष - संतोष नारायण पाटील
उपाध्यक्ष - श्रीनिवास दे भातकांडे
सेक्रेटरी - मारुती मो बेळगावकर
उपसेक्रेटरी - विनोद पिराजी पाटील
खजिनदार - परशराम यशवंत पाटील
उपखजिनदार - रुपेश प्रकाश पाटील

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : सावगाव येथे छञपती शिवाजी महाराजांची सिंहासनारुढ मूर्ती;
समस्त शिवभक्तांना आवाहन - श्री शिवस्मारक सेवा समिती, सावगाव

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm