मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट, MSP मध्ये केली बंपर वाढ

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट, MSP मध्ये केली बंपर वाढ

belgavkar.com | belgaum | belgavkar

आता मिळणार एवढा पैसा;
भाताच्या किमान हमीभावामध्ये 143 रुपयांनी वाढ

Minimum Support Price (MSP)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने आज अनेक पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यावेळी धानावर 7 टक्के एमएसपी वाढवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, मुग डाळीसाठीचा किमान हमीभाव सर्वाधिक 10.4 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. शेंगदाण्यावार 9 टक्के. धानावर 7 टक्के, ज्वारी, बाजरी, उडीद डाळ, सोयाबीन, सूर्यफूल यांच्यासाठीच्या हमीभावामध्ये 6-7 टक्के वाढ करण्यात आली आहे.
सरकारने 2023-24 वर्षासाठी भाताच्या किमान हमीभावामध्ये 143 रुपयांनी वाढ करून तो 2183 रुपये प्रतिक्विंटल करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना भातशेतीसाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांचं उत्पन्न वाढवणे, हा यामागचा हेतू आहे. पंतप्रधाम नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये 2023-24 च्या पीक वर्षासाठी खरिपाच्या सर्व पिकांमध्ये हमीभावात वाढ करण्यास मान्यता दिली आहे.
अन्न आणि ग्राहक संबंधांचे मंत्री पीयूष गोयल यांनी सीसीईएच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले की, कृषिक्षेत्रामध्ये आम्ही सीएसीपीच्या शिफारशींच्या आधारावर हमीभाव निश्चित करतो. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी हमीभावामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

Big gift to farmers from Modi government bumper increase in MSP money to get now

Modi government bumper increase in MSP money Minimum Support Price

Cabinet Approves Increased MSP For Kharif Crops For Marketing Season

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना मोठी भेट, MSP मध्ये केली बंपर वाढ
आता मिळणार एवढा पैसा; भाताच्या किमान हमीभावामध्ये 143 रुपयांनी वाढ

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm