वडिलांच्या स्मरणार्थ सचिन तेंडुलकर शाळा बांधणार, मोफत शिक्षण देणार

वडिलांच्या स्मरणार्थ सचिन तेंडुलकर शाळा बांधणार, मोफत शिक्षण देणार

belgavkar.com | belgaum | belgavkar

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर;
Sachin Tendulkar Foundation

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने नुकताच त्याचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला... क्रिकेटचा देव असलेला सचिन खऱ्या आयुष्यात गरीब मुलांसाठी देवच ठरला आहे. 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर त्याने अनेक सामाजिक कार्य केले आहेत. सचिन तेंडुलकर फाऊंडेशन (Sachin Tendulkar Foundation)  मध्य प्रदेश येथील संदालपूर गावात शाळा बांधणार आहे.  
मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातल्या खाटेगाव तालुक्यातील या गावात सचिन तेंडुलकर फाऊंडेशन पोहोचले आहे. 2011च्या आकडेवारी नुसार या गावाच्या साक्षरतेचं प्रमाण कमी आहे आणि त्यात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने तेथे शाळा बांधण्याचा आणि पुढील दहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक येथील व आसपासच्या जवळपास 2300 मुलांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.  सचिन तेंडुलकर फाऊंडेशनने ही शाळा तेंडुलकरच्या पालकांना समर्पित केली आहे. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठमोठे विक्रम नोंदवले आहेत. 100 आंतरराष्ट्रीय शतकं झळकावणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याच्या नावावर 200 कसोटीत 15921, 463 वन डेत 18426 धावा आहेत. 

sachin tendulkar foundation will build a school in sandalpur free education



Sachin Tendulkar Foundation builds school in Sandalpur to provide free Education

Sachin Tendulkar takes responsibility of educating tribal children in MP village

वडिलांच्या स्मरणार्थ सचिन तेंडुलकर शाळा बांधणार, मोफत शिक्षण देणार
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर; Sachin Tendulkar Foundation

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm