अयोध्यामध्ये श्रीराम जन्मभूमी मंदिर च्या निर्माणाला सुरूवात; लोखंडाच्या वापराशिवाय साकारणार पूर्ण रचना

अयोध्यामध्ये श्रीराम जन्मभूमी मंदिर च्या निर्माणाला सुरूवात;
लोखंडाच्या वापराशिवाय साकारणार पूर्ण रचना

belgavkar.com | belgaum | belgavkar

श्रीराम मंदिर निर्माणासाठी किती वर्ष लागणार...?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्या राम मंदिराचे (Shri Ram Janmbhoomi Mandir) भूमिपूजन झाल्यानंतर आता मंदिराच्या उभारणीच्या कामाला सुरूवात झाली आहे. दरम्यान सध्या इंजिनिअर्स मंदिराच्या ठिकाणी मातीची तपासणी करत आहेत. येत्या पुढील तीन ते साडे तीन वर्षांमध्ये राम मंदिर उभारणीचं काम पूर्ण केले जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्ट कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मंदिर उभारणीचं काम पूर्ण होण्यासाठी 36-40 महिन्यांचा कालावधी लागणं अपेक्षित आहे. दरम्यान ट्रस्ट कडून अजून एक महत्त्वाची बाब नमूद करण्यात आली आहे. ती म्हणजे या श्रीराम मंदिराच्या कामामध्ये लोखंडाचा (Iron) वापर केला जाणार नाही.
दरम्यान रामजन्मभूमी मंदिर शिलान्यास आणि भूमिपुजनापूर्वीच राम मंदिराचे एक मॉडेल प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये भारतीय वास्तुकलेचं दर्शन घडवणारं मॉडेल चित्रांच्या माध्यमातून ट्वीटरवर श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्ट कडून प्रसिद्ध करण्यात आलं होतं. मीडीया रिपोर्ट्सनुसार, लर्सन एंड टूब्रो कंपनी, आईआईटी च्या इंजीनियर्साकडून राम मंदिर निर्माणासाठी मदत घेतली जाणार आहे. लोखंडाऐवजी तांब्याचा वापर केला जाणार आहे. पंतप्रधानांनी भूमिपुजनाच्या वेळेस चांदीच्या वीटेचं पुजन केले होते. तसेच प्राजक्ताच्या फूलाचं रोपटं लावण्यात आले आहे. हिंदू पुराणातील कथांमध्ये समुद्रमंथनातून प्राजक्ताचं फूल पृथ्वीवर आल्याची अख्यायिका  आहे.
दरम्यान श्री रामजन्मभूमि तीर्थ क्षेत्र कडून  राम भक्तांना तांब्याच्या पट्ट्यांचं दान करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. मंदिराच्या निर्माणामध्ये दगडांचा वापर केला जाणार आहे. त्यांना जोडण्यासाठी तांब्याच्या पट्ट्या आवश्यक आहेत. ही पट्टी 18 इंच लांब, 3 mm खोल, 30 mm जाडीच्या असणं आवश्यक आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

अयोध्यामध्ये श्रीराम जन्मभूमी मंदिर च्या निर्माणाला सुरूवात; लोखंडाच्या वापराशिवाय साकारणार पूर्ण रचना
श्रीराम मंदिर निर्माणासाठी किती वर्ष लागणार...?

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm