बेळगाव : ‘या’ 3 महापुरुषांच्या पुतळ्यांचा उद्या अनावरण सोहळा

बेळगाव : ‘या’ 3 महापुरुषांच्या पुतळ्यांचा उद्या अनावरण सोहळा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगावमध्ये शूर-वीरांच्या प्रतिमा-पुतळ्यावरून राजकारण

बेळगाव : सीमाभागात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक समाजातील नागरिकांवर आपली छाप पाडून निवडणुका ‘कॅच’ करण्याचा प्रयत्न राजकारण्यांनी सुरु केला आहे. बेळगावमध्ये शूर-वीरांच्या प्रतिमा-पुतळ्यावरून सुरु असलेल्या राजकारणामुळे नेत्यांपेक्षा पुतळ्यांचेच राजकारण सुरु असल्याचे दिसून येत आहे. धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्ती परिसराचे सुशोभीकरण पार पडल्यानंतर भव्य उदघाटन सोहळा झाला. त्यानंतर राजहंसगडावरील शिवमूर्तीच्या अनावरणाचा सोहळा. यानंतर इतर भाषिकांचा रोष ओढवून घेतल्याने त्यांना खुश करण्यासाठी कर्नाटकातील भाजपा सरकारने संत जगत्ज्योती बसवेश्वर महाराजांपासून वीर राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळी रायन्ना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे राजकारण सुरु झाले.
वीर राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळी रायन्ना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण
आता बेळगावच्या सुवर्णसौध समोर वीर राणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळी रायन्ना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण होऊ घातले आहे. मंगळवारी (28 मार्च) सकाळी 11.00 वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते या तिन्ही पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री गोविंद कारजोळ, सार्वजनिक बांधकाम मंत्री सी. सी. पाटील हेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
हिवाळी अधिवेशनादरम्यान या तिन्ही पुतळ्याचं भूमिपूजन सोहळा पार पाडण्यात आला होता. या तिन्ही पुतळ्यासाठी सुमारे अडीज कोटी रुपये खर्च करण्यात आले असून ₹ 1.8 कोटी राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या पंचधातूच्या पुतळ्यासाठी, 72 लाख रुपये क्रांतिवीर संगोळी रायन्ना आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी खर्च करण्यात आले आहेत.

Statues of great men will be unveiled tomorrow belgaum svs belgaum बेळगाव belgavkar belgaum statue

Veer Rani Kittur Channamma Krantiveer Sangoli Rayanna and Babasaheb Ambedkar statue unveiled

statue in front of Suvarna Soudh of Belgaum svs

बेळगाव : ‘या’ 3 महापुरुषांच्या पुतळ्यांचा उद्या अनावरण सोहळा
बेळगावमध्ये शूर-वीरांच्या प्रतिमा-पुतळ्यावरून राजकारण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm